Tofkhana Police Station : नगर : तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) तक्रार न घेतल्याच्या कारणावरुन कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदार (Police Officer) यांना एकाने शिवीगाळ व धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना मंगळवारी (रा.२२) रात्री घडली. या प्रकरणी राकेश छबुराव गुंजाळ (रा. प्रतिमा कॉलनी पाईपलाईन रोड अ.नगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : पुण्यातील धनकवडीत २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; २० ते २५ वाहनांची तोडफोड
टाईप केलेल्या तक्रारीची प्रत दाखवून तक्रार नोंदवण्याची मागणी
याबाबत पोलीस हवालदार गणेश साठे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे ठाणे अंमलदार कर्तव्यावर असताना, एका महिलेची तक्रार नोंदवण्याचे काम करीत होते. त्यावेळी राकेश छबुराव गुंजाळ (रा. प्रतिमा कॉलनी पाईपलाईन रोड अ.नगर) हे त्यांच्या वडिलांसह पोलीस ठाण्यात आले व त्यांनी टाईप केलेल्या तक्रारीची प्रत दाखवून तक्रार नोंदवण्याची मागणी केली.
अवश्य वाचा : सुवर्णपदक विजेता देवदत्तने साधला I❤️नगरशी खास संवाद…
आरडाओरडा करत धक्काबुक्की (Tofkhana Police Station)
संबंधित तक्रार कौटुंबिक व फसवणुकीचे आरोप असल्याने फिर्यादी यांनी गुंजाळ यांना याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क करण्यास सांगितले. याचा राग येऊन राकेश गुंजाळ याने पोलीस ठाण्यात आरडाओरडा करत फिर्यादी यांना धक्काबुक्की केली. याबाबत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.