Tofkhana Police Station : बांधकाम साहित्याची चोरी; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Tofkhana Police Station : बांधकाम साहित्याची चोरी; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0
Tofkhana Police Station : बांधकाम साहित्याची चोरी; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Tofkhana Police Station : बांधकाम साहित्याची चोरी; तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Tofkhana Police Station : नगर : सावेडी उपनगरातील एका घराशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी (Thief) ३० हजार ९९७ रुपये किंमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेल्याची घटना राजमाता कॉलनी जवळील निळकंठ हौसिंग सोसायटीत घडली आहे.

नक्की वाचा : बिडी कामगारांच्या घरांच्या जागांची परस्पर विक्री; पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन

अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल (Tofkhana Police Station)

याबाबत विश्वनाथ शंकर निर्वाण (वय ६४, निळकंठ हौसिंग सोसायटी, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी (Complaint) यांच्या घराच्या जवळील पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून आत प्रवेश करत शेड मध्ये ठेवलेले ३० हजार ९९७ रुपये किंमतीचे विविध प्रकारचे बांधकाम साहित्य चोरून नेले. ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांनी २६ डिसेंबर रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.