Tofkhana Police Station : रेल्वे ट्रॅकवर सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू; तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद

Tofkhana Police Station : रेल्वे ट्रॅकवर सापडलेल्या व्यक्तीचा मृत्यू; तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद

0

Tofkhana Police Station : नगर : कल्याण रस्ता ब्रिज जवळील रेल्वे ट्रॅकवर (Railway track) बेवारस अवस्थेत आढळून आलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अवश्य वाचा: महापालिका निवडणूक; प्रचार फेऱ्यांचे होणार पोलिसांकडून स्वतंत्र व्हिडिओ चित्रीकरण

कल्याण रस्ता ब्रिज जवळ घडली होती घटना

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुबोध अमर काटे (वय ५२, रा. अहिल्यानगर) हे १७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी कल्याण रस्ता ब्रिज जवळील रेल्वे ट्रॅकवर गंभीर अवस्थेत पडलेले आढळून आले होते. या घटनेत त्यांचा डावा पाय रेल्वे अपघातात कापला गेला होता. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नक्की वाचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा युतीच्या विजयाची नांदी ठरेल – डॉ. सुजय विखे

उपचारा दरम्यान मृत्यू (Tofkhana Police Station)

वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर के. यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते.मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी (ता ६) रोजी सकाळी ९ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रूग्णालय ड्युटीवरील पोलीस अंमलदार विलास लोणारे यांनी तोफखाना पोलीस ठाण्याला कळवली. त्यावरून तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.