
Tofkhana Police Station : नगर : अहिल्यानगर शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन (Minors) मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी हमीद शौकत सय्यद (वय २४, रा. लोंढे मळा, कल्याण रोड, अहिल्यानगर) याने पीडित मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले, ज्यामध्ये पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी (Kiran Kumar Kabadi) यांनी तातडीने तपास पथके रवाना केली होती.
नक्की वाचा : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रक स्पर्धेमध्ये अहिल्यानगर संघाचा सहभाग
सापळा रचून आरोपी ताब्यात
गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना, (ता. २१) फेब्रुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत महत्वाची माहिती मिळाली. आरोपी हमीद सय्यद हा लाल टाकी परिसरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे संशयास्पदरित्या उभा असल्याची खात्री पटताच, पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
अवश्य वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना; आरोपी जेरबंद
खाक्या दाखवताच गुन्हा कबूल (Tofkhana Police Station)
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार गणेश लबडे, फुरकान शेख, दीपक घाटकर, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे आणि सहकाऱ्यांचा समावेश होता. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला पुढील तपासासाठी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


