Tofkhana Police Station : चैन स्नॅचिंग करणारा आरोपी जेरबंद; तोफखाना पोलिसांची कारवाई  

Tofkhana Police Station

0
Tofkhana Police Station : चैन स्नॅचिंग करणारा आरोपी जेरबंद; तोफखाना पोलिसांची कारवाई  
Tofkhana Police Station : चैन स्नॅचिंग करणारा आरोपी जेरबंद; तोफखाना पोलिसांची कारवाई  

Tofkhana Police Station : नगर : अहिल्यानगर शहरात चैन स्नॅचिंग (Chain Snatching) करणारा संशयित आरोपी तोफखाना पोलिसांनी (Tofkhana Police Station) नागापूर परिसरातून ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल

संशयिता नागापूर परिसरातील असल्याची माहिती

किरण दशरथ पालवे (वय-२४, रा-नागापुर गावठाण, ता. जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार कविजंग नगर गुलमोहर रस्त्यावर पहाटेच्या वेळी महिलेच्या गळ्यातील सोने पळविणारा हा नागापूर परिसरातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकास सूचना देऊन आरोपी ताब्यात घेण्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला नागापूर परिसरातून ताब्यात घेतले.

अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती

दुचाकी तसेच सोने पोलिसांनी घेतले ताब्यात (Tofkhana Police Station)

त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तसेच चोरी केलेले सोने तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शहर उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार सुनील चव्हाण, नितीन उगलमुगले, अब्दुल कादर इनामदार, योगेश चव्हाण, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सुरज वाबळे, सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतीश त्रिभुवन, सुजय हिवाळे, बाळासाहेब भापसे, सतीश भवर, दादा रोहोकले, भागवत बांगर यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here