Tofkhana Police Station : तोफखाना हद्दीत अवैध बिंगो, जुगारावर पोलीस पथकाचे छापे 

Tofkhana Police Station : तोफखाना हद्दीत अवैध बिंगो, जुगारावर पोलीस पथकाचे छापे 

0
Tofkhana Police Station : तोफखाना हद्दीत अवैध बिंगो, जुगारावर पोलीस पथकाचे छापे 
Tofkhana Police Station : तोफखाना हद्दीत अवैध बिंगो, जुगारावर पोलीस पथकाचे छापे 

Tofkhana Police Station : नगर : शहरात नव्याने रूजू झालेले पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे (Dilip Tiparse) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने अवैध बिंगो व जुगार (Gambling) धंद्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. तोफखाना पोलीस ठाणे (Tofkhana Police Station) हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकून बिंगो व कल्याण मटका जुगार खेळविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली.

अवश्य वाचा: लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या क्रूरतेचा कळस; खून करून मृतदेह पुरल्याचे तपासात उघड

३० हजार ६१० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत (Tofkhana Police Station)

झुलेलाल मंदिराच्या मागील बाजूस महाराजा चिकन दुकाना शेजारील शेडमध्ये छापा टाकण्यात आला. या ठिकाणी एलसीडी स्क्रीनवर आकडे दाखवत लोकांकडून पैसे लावून ऋषिकेश राजू चव्हाण (रा. रासनेनगर चौक, सावेडी) हा बिंगो जुगार खेळवित असल्याचे पोलिसांनी रंगेहात पकडले. तर खेळणाऱ्या इसमाचे नाव रवींद्र बलबीरसिंग सैंगर (रा. वृंदावन कॉलनी, बोल्हेगाव) असे समोर आले. त्यांच्याकडून ३० हजार ६१० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. किशोर रावसाहेब उमाप (रा. शांतीपुर, तारकपूर, अहिल्यानगर) हा इसम लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका जुगार खेळविताना पकडला. त्याच्या ताब्यातून १ हजार ६१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवाया प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.