Tofkhana Police Station : नगर : तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) दाखल असलेल्या खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपींनी न्यायालयाने घातलेल्या जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचे उघड झाल्याने, संबंधित आरोपींवर (संघटित गुन्हेगारी) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी संबंधित गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे (Local Crime Branch) वर्ग करून तपास पुढे नेण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेला पुढील चौकशी तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अवश्य वाचा : भारताच्या पोरी जगात भारी; विश्वचषकावर कोरलं नाव!
संशयित आरोपींवर खूनाचा प्रयत्नासह इतर गंभीर गुन्हे दाखल
या गुन्ह्यातील फिर्यादीच्या बाजूने ज्येष्ठ विधी तज्ञ ॲड. अभिजित पुप्पाल हे काम पाहत आहेत. पवन दीपक पवार हा या टोळीचा प्रमुख असून सदरचा गुन्हा तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तोफखाना पोलीस ठाण्यातील या गुन्ह्यात संशयित आरोपींवर खूनाचा प्रयत्नासह इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल होता.
नक्की वाचा : जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड
जामीन मिळाल्यानंतर ठरवलेल्या अटींचे उल्लंघन (Tofkhana Police Station)
आरोपींना न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर त्यांनी ठरवलेल्या अटींचे पालन करण्याऐवजी पुन्हा गुन्हेगारी कृत्ये केली, तसेच पोलीस तपासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या वाचक शाखेने चौकशी केली असता आरोपींनी जामिनाच्या अटींचे स्पष्ट उल्लंघन केले असून, संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे पुरावे आढळले. या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संबंधित गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करून तपास पुढे नेण्याचे आदेश दिले.



