
Tofkhana Police Station : नगर : बोल्हेगाव येथील गांधीनगर परिसरात सुरु असलेल्या पत्त्याच्या क्लबवर (Gambling) तोफखाना पोलिसांनी (Tofkhana Police Station) छापा टाकून तब्बल ३ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात १३ जणांविरोधात गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई
गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे
गणेश दशरथ गोरे (वय ३७, रा.गांधीनगर), राजू बाबु शेख (वय ४९, रा.मराठी शाळेजवळ, बोल्हेगाव), भाऊसाहेब रफायल बोर्डे (वय ३५, रा. गांधीनगर, चोभे कॉलनी), पिंन्टु प्रकाश ओहळ (वय ३२, रा.रेणुका नगर, ता. जि अहिल्यानगर), नितिन मनोहर चाबुकस्वार (वय ३८,रा. गणेश चौक), दीपक सुरेश नेटके (वय ३५, रा. सावेडीगाव), अजिज अकबर सय्यद (वय २३,रा. बोल्हेगाव), जमीर शौकत पठाण (वय २३, रा. आबेडकर चौक, ता. जि. अहिल्यानगर), सुधीर सुनील धांडे (वय २३, रा. मोरया पार्क, अहिल्यानगर), राजू बाबासाहेब शिंदे (वय ३५, रा.गांधीनगर, बोल्हेगाव), अनिल वसंत आव्हाड (वय ३६, रा. बालाजी नगर, बोल्हेगाव), लखन शंकर शिंदे (वय ३९, रा. वैदुवाडी), विकी विष्णू शिंदे (वय ३० रा.नागापूर, चक्रधर स्वामी मंदिराशेजारी, ता. जि अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
नक्की वाचा : कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त; संगमनेरमध्ये मोठी कारवाई
३ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत (Tofkhana Police Station)
त्यांच्याकडून ३ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत पोलीस बाळासाहेब भापसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांना मिळालेल्या माहितीनुसार बोल्हेगाव परिसरात पत्त्याचा क्लब सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून छापा टाकला. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार सुनिल चव्हाण, नितिन उगलमुगले, भानुदास खेडकर, योगेश चव्हाण, सुरज वाबळे, सुधीर खाडे, सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन, बाळासाहेब भापसे, फसले यांच्या पथकाने केली.


