Mumbai Toll Free:मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी,राज्य सरकारचा मोठा निर्णय

0
Mumbai Toll Free:मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी,राज्य सरकारचा मोठा निर्णय
Mumbai Toll Free:मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी,राज्य सरकारचा मोठा निर्णय

Mumbai Toll Free : विधानसभा (Vidhan Sabha Election) तोंडावर आल्याने आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केली. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी (Toll Free) करण्यात आलीय. आज रात्री बारा वाजल्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

नक्की वाचा : बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक अत्याचार करणारे तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

‘या’ पाच टोलनाक्यावर टोलमाफी? (Mumbai Toll Free)

मुंबईतील आनंदनगर टोल नाका, दहिसर टोलनाका,मुलुंड-एलबीएस टोल नाका, वाशी टोलनाका,ऐरोली टोलनाका या नाक्यावर ही टोल माफी करण्यात आली. या टोलनाक्यांवरून जाताना लहान वाहनांवर टोलचा भार होता. यावर्षी या टोल नाक्यांवर हलक्या वाहनांचा टोल ४५ रुपये करण्यात आला होता. दर तीन वर्षांनी टोलवाढीच्या नियमांतर्गत ही वाढ करण्यात आली होती. सन २००० पासून, मुंबईत ये-जा करणारे लोक शहराच्या प्रवेशद्वारावर टोल शुल्क भरत आहेत. परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लहान वाहनांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज रात्रीपासून लहान वाहनांकडून या पाचही टोलनाक्यांवरून टोल घेतला जाणार नाही.

अवश्य वाचा :  प्रथमेश परबच्या आगामी ‘हुक्की’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

राज्याच्या तिजोरीवर टोल माफीचा बोजा (Mumbai Toll Free)

मुंबईतील टोल माफीचा मोठा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. जवळपास पाच हजार कोटी रुपयांचा भार राज्याच्या तिजोरीवर पडेल. मुंबईतील पाच टोलनाक्यावरील टोलमाफीचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारला जवळपास पाच हजार कोटी रुपये संबंधित कंत्राटदाराना द्यावे लागतील. पाच टोलपैकी चार टोलची मुदत २०२७ पर्यंत आहे तर एक टोल २०२९ पर्यंत आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व हलक्या वाहनांना ही टोल वसुली मिळणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने या मोठ्या घोषणा केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here