Toll On National Highways: मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गावर (National Highway)आकाराला जाणारा टोल (Toll) चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच आता सरकारने काही राष्ट्रीय महामार्गावरील काही भागांच्या टोल दरात मोठी कपात (Big Reduction in Toll Rates) करण्याची घोषणा केली आहे. यानुसार ज्या राष्ट्रीय महामार्गावर बोगदे, पूल, उड्डाणपूल आणि एलिव्हेटेड कॉरिडॉर असतील त्या भागात टोल दरात ५० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग (MORTH) मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २००८ मध्ये टोल दर मोजण्याच्या सुत्रामध्ये सुधारणा केली आहे. या बदलासंबंधी २ जून २०२५ ला अधिकृतपणे अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे आता प्रवाशांचा भार हलका होणार आहे.
नक्की वाचा : शुभमन गिलने रचला इतिहास;सचिन तेंडुलकर व विराट कोहलीचाही मोडला रेकॉर्ड
नवीन फॉर्म्युला काय आहे? (Toll On National Highways)
वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत सांगितलं आहे की,असे बांधकाम झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भागात दरांची गणना दोन पद्धतीने केली जाणार आहे.
नवीन नियमांनुसार, महामार्गाच्या टप्प्यांवर टोलचे दर हे दोन पद्धतीने मोजले जातील आणि यापैकी जे कमी असेल त्यानुसार टोलचा दर ठरवला जाईल.
अवश्य वाचा : पुणे हादरलं! कोंढव्यात तरुणीवर घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून अत्याचार
टोलचे दर पुढील २ पद्धतीने ठरवले जातील (Toll On National Highways)
१.
उर्वरित महामार्गाच्या सेक्शनमध्ये म्हणजे पूल, बोगदा अशी संरचना वगळून संरचनेच्या लांबीच्या दहा पट जोडून असलेले किंवा
२.
संरचनेच्या लांबीचा समावेश करून पाच पट यामध्ये स्वातंत्र्य पूल, बोगदा, उड्डाणपूल किंवा एलिव्हेटेड हायवे, असेही या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे.
निर्णयाचा लाभ कोणाला होणार ? (Toll On National Highways)
सरकारने केलेल्या या घोषणेमुळे त्या प्रवाशांना विशेष लाभ होईल जे लांब फ्लायओव्हर,बोगदे किंवा एलिव्हेटेड रस्त्यावरून प्रवास करतात. डोंगराळ प्रदेश असलेली राज्य, मेट्रो शहरांच्या बाहेरील बाजूला असलेला आऊटर रिंग रोड, मोठे बोगदे, पुल असलेले रस्ते यावरून प्रवास करणाऱ्यांना याचा लाभ होईल. हा बदल मोठ्या वाहनांसाठी फायदेशीर ठरेल कारण त्यांना प्रवासी वाहनांच्या तुलनेत पाच पट अधिक टोल द्यावा लागतो.