Toll Tax Rate Increase: राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास होणार महाग; आजपासून टोल दरात वाढ 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, टोल दरात दरवर्षी वाढ करण्यात येत असते. ही दरवाढ आधीच होणार होती.

0

नगर : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha election) सात टप्प्यातील मतदान पूर्ण होताच आता नागरिकांना राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे महाग पडणार आहे. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आजपासून टोल दरात पाच टक्क्या पर्यंतची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन जूनच्या मध्यरात्रीपासून देशातील सर्व महामार्गावरील टोल दरात वाढ (Increse Toll Rates) करण्यात आली आहे.

नक्की वाचा : पश्चिम बंगालमध्ये राडा;तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजप उमेदवाराला घेरलं तर एकीकडे ईव्हीएम पाण्यात  

टोलच्या दरात ३ ते ५ टक्क्यांपर्यंतची वाढ (Toll Tax Rate Increase)

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, टोल दरात दरवर्षी वाढ करण्यात येत असते. ही दरवाढ आधीच होणार होती, मात्र आचारसंहितेच्या काळात टोल दरात वाढ करू नये, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यामुळे टोल दरवाढ या काळात रोखण्यात आली होती. आता ३ जून २०२४ पासून टोलच्या दरात ३ ते ५ टक्क्यांपर्यंतची वाढ करण्यात येत आहे. सोमवारपासून देशभरातील १,१०० टोल प्लाझावर ही टोल दरवाढ होणार आहे.

अवश्य वाचा : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आढळले तळघर;मंदिराचे गूढ वाढले 

दूध दरातही दोन रुपयांची वाढ  (Toll Tax Rate Increase)

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच आता नागरिकांना महागाईचा आणखीच झटका बसला आहे. गुजरात कॉर्पोरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमुल दुधाच्या किंमतीत प्रती लीटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. दुधाच्या वाढलेल्या किंमती आजपासून (ता. ३) लागू झाल्या आहेत. अमुलने जाहीर केलेल्या नव्या किंमतींनुसार ‘अमुल गोल्ड’च्या अर्धा लीटरच्या पिशवीसाठी आता ३२ ऐवजी ३३ रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच ग्राहकांना अमुल गोल्डच्या एक लीटर पाऊचसाठी आता ६४ ऐवजी ६६ रुपये खर्च करावे लागणार आहेत. ‘अमुल ताजा’साठी (अर्धा लीटर) २६ ऐवजी २८ रुपये, ‘अमुल शक्ती’साठी (अर्धा लीटर) २९ ऐवजी ३० रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र दुधाच्या वाढलेल्या किंमतींमुळे सामान्य नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here