Total Maratha Society : कर्जत : मुंबई (Mumbai) येथील आझाद मैदानात शुक्रवारपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarnge Patil) यांचे मराठा समाजाच्या आरक्षण (Maratha Reservation) मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. मंगळवारी उपोषणाचा पाचवा दिवस असून राज्य सरकार मराठा आरक्षणबाबत सकारात्मक भूमिका घेत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कर्जत शहरात सकल मराठा समाजाच्या (Total Maratha Society) वतीने बंद पाळण्यात आला. यावेळी सर्व व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद ठेवत प्रतिसाद दिला.
नक्की वाचा: मेल्यानंतरही मरण यातना; भर पावसात ताडपत्री धरून अंत्यसंस्कार!
झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी बंदची हाक
२९ ऑगस्टपासून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी उपोषणाचा पाचवा दिवस असून राज्य सरकार मराठा आरक्षणसंबंधी कोणतीही ठोस भूमिका जाहीर करताना दिसत नाही. या उपोषणा दरम्यान जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली जात आहे. सरकार केवळ बघ्याची भूमिका घेणार असेन आणि मराठा समाजास कोणतीही मदत करणार नसेल तर या झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी सकल मराठा समाज कर्जत यांच्यावतीने मंगळवारी कर्जत बंदची हाक देण्यात आली होती.
अवश्य वाचा : मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यांसाठी कर्जतहून प्रेमाची शिदोरी
आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा (Total Maratha Society)
यावेळी शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपले व्यवहार कडकडीत बंद ठेवत त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. यावर देखील सरकार मराठा आरक्षणासाठी वेळकाढूपणा करणार असेल तर यापुढे गावपातळीवर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्जतचे प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.