Total Maratha Society : नगर : मुंबई येथे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षणाच्यासंदर्भात (Maratha Reservation) सुरू असलेल्या आंदोलनाच्या समारोपात मराठा आरक्षण कृती समितीचे (Total Maratha Society) अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मनोज जरांगे यांना दिलेल्या आश्वासनानुसार मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यात गेल्या २०२४ वर्षात झालेल्या आंदोलनांबद्दल दाखल गुन्ह्यांपैकी ११ गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या त्रिस्तरीय समितीने पात्र केले आहेत.
अवश्य वाचा : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सोशल मीडियातून टीकेचा भडीमार
पोलीस अधीक्षक यांची नुकतीच घेतली भेट
दरम्यान गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीच्या अनुषंगाने अहिल्यानगर सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नुकतीच भेट घेतली व जिल्ह्यातील सर्व मराठा आरक्षण आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासंदर्भात चर्चा केली. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने ॲड. अनुराधा येवले, ॲड गजेंद्र दांगट, ॲड. हरीश भामरे यांच्यासह मदन आढाव, वैभव भोगाडे, स्वप्निल दगडे आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : सावेडी उपनगरात युवकावर कोयत्याने हल्ला; सात जणांविरूध्द गुन्हा दाखल
यावेळी पोलीस अधीक्षक घार्गे म्हणाले, (Total Maratha Society)
त्रिसदस्य समिती गठीत केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील साधारण ११ पोलीस ठाण्यांतील गुन्हे तपासून माघारीची प्रक्रिया केली आहे. बाकीच्या राहिलेले गुन्ह्यांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती दिली.
दरम्यान या गुन्ह्यांमध्ये कोपरगाव, नगर एमआयडीसी, भिंगार कॅम्प व श्रीगोंदे पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन तर कोतवाली, शेवगाव व श्रीरामपूर पोलीस ठाण्यांतील प्रत्येकी एका गुन्ह्याचा समावेश आहे. मागे घेण्यास पात्र ११ गुन्हे वगळता अन्य गुन्हेही मागे घेण्याबाबत समितीव्दारे तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.