Trader : नगर तालुक्यातील ताबेमारीच्या प्रश्नावर व्यापारी आक्रमक

Trader : नगर तालुक्यातील ताबेमारीच्या प्रश्नावर व्यापारी आक्रमक

0
Trader : नगर तालुक्यातील ताबेमारीच्या प्रश्नावर व्यापारी आक्रमक
Trader : नगर तालुक्यातील ताबेमारीच्या प्रश्नावर व्यापारी आक्रमक

Trader : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) तालुक्यातील वाटेफळ येथील अनिल वालचंद गांधी, विजय वालचंद गांधी, बाबुर्डी येथे सुदर्शन डुंगुरवाल आणि वाकोडी येथे धनेश कोठारी यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करत राजरोजपणे पाल टाकण्याचे काम केले जाते. त्याच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी (Trader) संघटित होऊन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) राकेश ओला यांची भेट घेतली. तसेच निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली.

अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा सरकारी तिजोरीवर भार;शासकीय खर्चाला कात्री

विशिष्ट समाजाकडून पाल टाकून ताबेमारी

अहिल्यानगर शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर अहिल्यानगर तालुक्यातील गावांमध्ये विशिष्ट समाजाकडून पाल टाकून ताबेमारी केली जाते. तसेच खंडणी मागत दमबाजी केली जाते, अशा लोकांचा बंदोबस्त करावा, यासाठी व्यापाऱ्यांनी आज (ता. ३०) पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून यावेळी कारवाईची मागणी केली तसेच अशा प्रवृत्तीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारकडे कायदा करण्याची मागणी केली जाईल तसेच सर्वसामान्य लोकांना न्याय-हक्क मिळाला पाहिजे यासाठी काम केले जाईल, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

नक्की वाचा : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन

पोलीस अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन (Trader)

यावेळी आमदार संग्राम जगताप, जयेश पोखरणा, पिंटू कटारिया, कमलेश भंडारी, दिनेश संकलेचा, रोहन बोरा, संदीप बोरा, गणेश बुरा, नितीन शिंगवी, रितेश सोनीमडलेचा, सचिन छाजेड, मनीष लोढा, ईश्वर बोरा, दिनेश संकलेचा, भरत गुरुनानी, पराग मानधना आदीसह व्यापारी उपस्थित होते. या प्रसंगी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन व्यापारी वर्गाला दिले.