Tradition : शोभायात्रेत धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा व परंपराचे प्रदर्शन

Tradition : शोभायात्रेत धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा व परंपराचे प्रदर्शन

0
Tradition : शोभायात्रेत धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा व परंपराचे प्रदर्शन
Tradition : शोभायात्रेत धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा व परंपराचे प्रदर्शन

Tradition : नगर : विचार भारती व जनसेवा फाउंडेशनच्या (Jan Seva Foundation) वतीने अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या जन्म जयंती निमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभा यात्रेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा ऐतिहासिक पारंपारिक (Tradition) वारशाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये आदिवासी कंबड नृत्य, महिलांचे टिपरी व फुगडी नृत्य, धनगर समाजाचे गजननृत्य सादर करण्यात आले. तसेच शोभायात्रेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा व परंपराचे प्रदर्शन करणारे १६ प्रकारच्या रथांचा समावेश होता.

नक्की वाचा : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमाफी;एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

विशाल गणपती रथास नारळ वाढवून शोभायात्रेचे उद्घाटन

शोभायात्रेचे उद्घाटन माजी खासदार सुजय विखे व अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते विशाल गणपतीच्या रथास नारळ वाढवून झाले. यावेळी पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या स्वागत अध्यक्ष धनश्री विखे, कार्याध्यक्ष राजेंद्र पाचे, विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे, उपाध्यक्ष अनिल मोहिते, अशोक गायकवाड, महेंद्र जाखेटे, रथयात्रा प्रमुख उदय भणगे, रवींद्र बारस्कर, मनोज झंवर तसेच जनसेवा फाउंडेशनचे निखिल वारे, धनंजय जाधव तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.

अवश्य वाचा : अरेच्चा! सरकारच्या २६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी

आकर्षक व भव्य रथांचा समावेश (Tradition)

शोभायात्रेच्या अग्रभागी ग्रामदैवत श्री विशाल गणपतीचा रथ, त्यामागे प्रभू श्रीराम, अहिल्यादेवी होळकर, आनंदऋषीजी महाराज, शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत निळोबाराय, संत ज्ञानेश्वर, सद्गुरु गोदड महाराज, शेख मोहम्मद बाबा, संत भगवान बाबा, साईबाबा. अगस्ती ऋषी, राघोजी भांगरे, जनजाती कल्याण आश्रम, वीर जवान, हिंदुजागृती व अखंड भारत भारत भारती आदी आकर्षक व भव्य रथांचा समावेश होता.