Traffic Changes : नगर : अकोले (Akole) तालुक्यातील पर्यटन (Tourism) स्थळांचे वाहतूक मार्ग गुरुवारपुर्ते (ता. १५) वळवण्याचे आदेश जिल्हा पोलीस (Police) अधीक्षक राकेश ओला (Rakesh Ola) यांनी अकोले तालुक्यातील पोलीस प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार १५ ऑगस्ट (15 August) रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील.
नक्की वाचा : आमची सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू’- संजय राऊत
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाय
राजूर पोलीस ठाणे हद्दीत भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा, हरिश्चंद्र गड, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर रतनवाडी, वाल्मिक ऋषी आश्रम, कोदणी या प्रेक्षणीय स्थळी पुणे, नाशिक, ठाणे मुंबई व नगर जिल्ह्यातून १५ ऑगस्टच्या सुट्टी निमित्त मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सध्या पावसामुळे येथील अरुंद रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत. तसेच काही रस्त्याचे दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांनी हे आदेश दिले आहेत. रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक वळवण्यात येत आहे.
अवश्य वाचा: मनाेज जरांगे गरजले; आता विधानसभेला दणादण नाव घेऊन पाडणार, कुणाचे टेन्शन वाढणार?
असा असणार मार्ग (Traffic Changes)
शेंडी अथवा भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघशी फाटा येथून प्रवेश देण्यात यावा.
एकेरी वाहतुकीचा मार्ग – वारंघुशी फाटा अथवा वाकी फाटा – चिचोंडी फाटा – यश रिसॉर्ट शेंडी – भंडारदरा धरण – स्पिलवे गेट – भंडारदरा गाव – गुहिरे रंधा मार्गे इच्छित स्थळी जातील.