Traffic Diversion : नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतुकीत बदल; आदेश जारी

Traffic Diversion : नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतुकीत बदल; आदेश जारी

0
Traffic Diversion : नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतुकीत बदल; आदेश जारी
Traffic Diversion : नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतुकीत बदल; आदेश जारी

काेड रेड…

Traffic Diversion : नगर : पत्रकार चौक ते एसपीओ चौकादरम्यान रस्त्याचे काँक्रिटीकरण, शिंगणापूर फाटा ते राहुरी दरम्यान रस्त्याचे दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गावरुन अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या अवजड वाहनांचा दिंडीतील भाविकांना धक्का लागून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिंडीमधील वारकऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) राकेश ओला यांनी नगर-मनमाड या महामार्गावरील विळद बायपास ते पुणतांबा फाटापर्यंतची अवजड वाहतूक २१ जुलैपर्यंत पर्यायी मार्गाने (Traffic Diversion) वळविण्याचे आदेश (Order) पारित केले आहेत.

नक्की वाचा: नगरसह विविध शहरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी

असा असणार पर्यायी मार्ग (Traffic Diversion)

            – शनिशिंगणापूर-सोनईवरुन राहुरीमार्गे मनमाडकडे जाणारी जड वाहने नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरुन इच्छित स्थळी जातील.

            – देहरे-राहुरी कृषी विद्यापीठ, राहुरीकडून मनमाडकडे जाणारे जड वाहने श्रीरामपूर-बाभळेश्वर-निर्मळ पिंपरी बायपासमार्गे कोपरगाव-येवला-मनमाडकडे जातील.

            – मनमाडकडून नगरकडे येणारे जड वाहने पुणतांबा फाटा-वैजापूर-गंगापूर-कायगाव-नेवासे-शेंडी बायपास-विळद बायपास-केडगाव बायपास मार्गे जातील.

            – लोणी-बाभळेश्वरकडून नगरकडे येणारी जड वाहने बाभळेश्वर-श्रीरामपूर-टाकळीभान-नेवासेमार्गे नगरकडे येतील.

            – मनमाडकडून नगरमार्गे पुणे-मुंबई-कल्याणकडे जाणारी जड वाहने पुणतांबा फाटा-झंगडे फाटा-सिन्नर-नांदूर शिंगोटे-संगमनेर-आळेफाटामार्गे जातील.

            – हा आदेश शासकीय वाहने, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड, दिंडीमध्ये सहभागी असलेल्या वाहनांना लागू राहणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here