Traffic Diversion : नगर-दाैंड महामार्गावरील वाहतुकीत बदल

Traffic Diversion : नगर-दाैंड महामार्गावरील वाहतुकीत बदल

0
Traffic Diversion : नगर-दाैंड महामार्गावरील वाहतुकीत बदल
Traffic Diversion : नगर-दाैंड महामार्गावरील वाहतुकीत बदल

काेड रेड

Traffic Diversion : नगर : नगर-दाैंड रस्त्यावर व्हीआरडीई (VRDE) जवळील रेल्वे गेट नंबर १ येथे रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर माेठ्या प्रमाणावर वाहतूक हाेत असल्याने अपघात हाेऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न (Law and order) निर्माण हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर-दाैंड महामार्ग दाेन दिवस वाहतुकीसाठी बंद (traffic) राहणार आहे, असा आदेश रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) जारी केला आहे. हा आदेश २७ ते २८ जुलैपर्यंत लागू राहणार आहे. 

नक्की वाचा : आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान

पर्यायी बायपास मार्गाचा वापर करण्याचे आवाहन (Traffic Diversion)

या आदेशानुसार नगर-दौंड महामार्ग बंद असल्याने नागरिकांनी पर्यायी बायपास मार्गाचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. नागरिकांना नगर-साेलापूर महामार्ग तसेच अरणगाव-पुणे बायपास आणि नगर- पुणे महामार्ग, अशा पर्यायी मार्गावरून इच्छित ठिकाणी जाता येणार आहे.  नागरिकांनी नियमांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here