कोड रेड
Traffic Diversion : नगर : अहिल्यानगर सायकलिंग क्लब (Ahilyanagar Cycling Club) व कल्पतरू ग्रुपतर्फे उद्या (ता. ४) नगर सायक्लोथॉन (Nagar Cyclothon) राईडचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच ते दुपारी १२ या कालवधीत केडगाव बाह्यवळण ते चांदबिबी महाल बाह्यवळण रस्त्याच्या एकेरी मार्गावर ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे या कालावधीत त्या रस्त्यावरील वाहतुकीत बदल (Traffic Diversion) करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन
केडगाव बाह्यवळण रस्त्याकडून पाथर्डीकडे जाणाऱ्या वाहतुकीत बदल –
केडगाव बाह्यवळण रस्त्या पुढील सोनेवाडी फाटा चौकातून (अरणगाव बायपास रेल्वे पूल वाळुंज बाह्यवळण -चांदबीबी महाल) पाथर्डी कडे उजवी कडील लेनवरुन एकेरी मार्गे पाथर्डीकडे
नक्की वाचा : विखे–जगताप एक्स्प्रेस सुसाट; पाच नगरसेवक बिनविरोध
दरेवाडी ते वाळुंज कडे जाणारा मार्ग (Traffic Diversion)
- दरेवाडी श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक (वाळुंज) कडे जाणाऱ्या सर्व वाहनांकरिता वाहतुकीचा मार्ग –
दरेवाडी – श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक (वाळुंज) कडे उजवी कडील लेनवरुन एकेरी मार्गे



