Traffic Jam : अहिल्यानगर शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर; पालकमंत्री विखे यांना निवेदन

Traffic Jam : अहिल्यानगर शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर; पालकमंत्री विखे यांना निवेदन

0
Traffic Jam : अहिल्यानगर शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर; पालकमंत्री विखे यांना निवेदन
Traffic Jam : अहिल्यानगर शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर; पालकमंत्री विखे यांना निवेदन

Traffic Jam : नगर : अहिल्यानगर शहरातील (Ahilyanagar City) वाहतूक कोंडीची (Traffic Jam) समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन सर्व संबंधितांना तत्काळ उपाय योजना करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अभय ललवाणी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

अवश्य वाचा : शिर्डीत एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने केले मतदान

सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना दिले स्मरणपत्र

शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत २४ जानेवारी २०२५ रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाच्या प्रती सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना देण्यात आले होत्या. मात्र, सर्व संबंधित शासकिय यंत्रणांनी त्यावर केवळ कागदोपत्री सोपास्कार पार पाडले. प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही आजवर केलेली नाही म्हणून पुन्हा एकदा पालकमंत्र्यांसह सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना अभय ललवाणी यांनी स्मरणपत्र दिले आहे.

नक्की वाचा : जिल्ह्यात ४ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

कायमस्वरूपी उपाययोजना हव्या (Traffic Jam)

शहरातील सर्व प्रमुख रस्ते व चौकांमधील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवणे, बंद पडलेले सिग्नल सुरू करणे, सर्व प्रमुख चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगविणे आदी उपाययोजना प्राधान्याने व तातडीने केल्यास वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात तत्काळ सुटू शकेल. मात्र, प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने दिवसेंदिवस शहरातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे आता पालकमंत्र्यांनीच ही समस्या गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी ललवाणी यांनी स्मरणपत्राद्वारे केली आहे.