Traffic Jam : वाहतूक कोंडी विरोधात पोलीस प्रशासनाची कारवाई

Traffic Jam : वाहतूक कोंडी विरोधात पोलीस प्रशासनाची कारवाई

0
Traffic Jam : वाहतूक कोंडी विरोधात पोलीस प्रशासनाची कारवाई
Traffic Jam : वाहतूक कोंडी विरोधात पोलीस प्रशासनाची कारवाई

Traffic Jam : नगर : अहिल्यानगर शहरात अनधिकृत रित्या विक्रीसाठी थांबलेले हॉकर (Unauthorized Hawkers), ठेले, दुकान चालक व वाहन चालकाविरुद्ध विशेष मोहीम राबवून वाहतूक कोंडी (Traffic Jam) विरोधात कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे (Dr. Dilip Tiparse) यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा (City Traffic Police), कोतवाली, भिंगार कॅम्प व तोफखाना पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे.

नक्की वाचा : टीईटी सक्ती रद्द करा; शिक्षक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

एकूण ९ ठिकाणी कारवाई

शहरात विविध रस्त्यावर व चौकात हॉकर्स चालक, ठेले चालक, फळ विक्रेते दुकान मांडून व वाहन चालक त्यांची वाहने रस्त्यावर उभी करून वाहतूक कोंडी करतात. त्यामुळे सामान्य जनतेला वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर (ता. ५) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या आदेशानुसार शहरातील कापड बाजार, पराग बिल्डिंग, चांद सुलताना हायस्कुल, महात्मा फुले चौक, नेप्ती नाका, चितळे रोड, सर्जेपुरा चौक, पत्रकार चौक ते प्रेमदान चौक, जिपीओ चौक, अशा वरील एकूण ९ ठिकाणी कारवाई करण्यात आली.

अवश्य वाचा : गावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

सुमारे १३५ जणांविरुध्द गुन्हे दाखल (Traffic Jam)

या कारवाई दरम्यान हॉकर्स, ठेले, दुकान चालक व वाहन चालक यांच्या विरुद्ध सुमारे १३५ गुन्हे दाखल करून सर्व दुकानदार व वाहन चालकांविरुद्ध नोटीस बजावल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखेचे बाबासाहेब बोरसे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर व अंमलदार यांनी केली.