Trainee IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरवर UPSC गुन्हा दाखल करणार; परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका!

Trainee IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरवर UPSC गुन्हा दाखल करणार

0
Trainee IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरवर UPSC गुन्हा दाखल करणार
Trainee IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरवर UPSC गुन्हा दाखल करणार

Trainee IAS Pooja Khedkar : नगर : गेल्या अनेक दिवसापासुन गाजत असलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Trainee IAS Pooja Khedkar) यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्याचा निर्णय UPSC ने घेतला आहे. तसंच डॅा. पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचं आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावली आहे. ही माहिती केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे.

Trainee IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरवर UPSC गुन्हा दाखल करणार
Trainee IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरवर UPSC गुन्हा दाखल करणार

नक्की वाचा : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतामध्ये खासदार लंके पुन्हा अव्वल

परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका

यूपीएससीने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पूजा खेडकर यांनी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यूपीएससीने प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्यावरील आरोपाची सखोल चौकशी केली असून त्यांनी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचं सिद्ध होत असल्याचे यूपीएससीने या परिपत्रकात म्हटलं आहे. याशिवाय पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची उमेदवारी का रद्द करू नये? असं प्रश्न विचारत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचंदेखील या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे.

अवश्य वाचा: कोतूळ येथील धरणे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरूच

खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप (Trainee IAS Pooja Khedkar)

पूजा खेडकर या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षेत देशभरातून ८४१ क्रमांक मिळाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्यांचा आजार सिद्ध करण्यासाठी आरोग्य तपासणी करण्यास सांगितले होते. मात्र सहावेळा नोटीस देऊनही खेडकर वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या.

काही दिवसांनी पूजा खेडकर यांनी दुसऱ्याच रुग्णालयात एमआरआय चाचणी अहवाल काढून तो लोकसेवा आयोगाकडे सादर केला. मात्र लोकसेवा आयोगाने हा अहवाल फेटाळून लावला होता. त्यानंतर आयोगाने खेडकर यांच्या नियुक्तीला कॅट (केंद्रीय प्रशासकीय लवाद) मध्ये आव्हान दिले होते. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी खेडकर यांच्याविरोधात निकाल दिला. मात्र काही काळाने त्यांचा एमआरआय अहवाल स्वीकारला गेला आणि त्यांची आयएएस अधिकारी म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here