Mumbai police Transfer : ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील २४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या (Transfer) करण्यात आल्या आहेत. सलग आठ वर्षापेक्षा अधिक काळ मुंबईत सेवा केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात आल्यात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. यापूर्वी देखील निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या.
नक्की वाचा : ‘मला आता मुख्यमंत्रीपदाची लालसा उरलेली नाही’- देवेंद्र फडणवीस
बदलीमुळे निवडणुकीच्या कामावर होणार परिणाम (Mumbai Police Transfer)
मुंबईतील १११ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर मुंबईत अवघे ११ पोलीस निरीक्षक बाहेरून आलेत. मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षकाची मंजूर पदे १०३२ आहेत. मात्र ३१ जुलै पर्यंत कार्यरत ८८१ होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता २४५ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे निवडणुकीच्या कामावर होणार परिणाम होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत आता नवीन पोलीस इन्स्पेक्टर येण्यास तयार नाहीत. सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने या बदल्या केल्यामुळे नवीन पोलीस निरीक्षक यांना प्रक्रिया समजून घेण्यासच निवडणुकीचा काळ देखील संपून जाईल.
अवश्य वाचा : शरद पवारांनी केलेल्या नक्कलेवर अजित पवारांची प्रतिक्रिया
१११ पोलीस निरीक्षकांच्या झाल्या होत्या बदल्या (Mumbai Police Transfer)
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यापैकी ११ पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईत झाली होती. निवडणूक आयोगाने मुंबईतील पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांची सूचना राज्य पोलीस दलाला केली होती. त्यानुसार, मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबईबाहेर करण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीवेळी आयोगाने राज्य सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने सूचना दिल्या होत्या. त्या सूचना राज्य सरकारने पाळल्या नव्हत्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांच्या घोषणा करण्यापूर्वी राज्य सरकारला खडे बोल सुनावले होते.