Transformer | राजापूर वीज उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मर क्षमतेत वाढ

समस्येवर मोठ्या प्रमाणात तोडगा

0

Transformer | संगमनेर: तालुक्यातील राजापूर येथील वीज उपकेंद्रावरील पॉवर ट्रान्सफॉर्मरची (Transformer) क्षमता वाढविण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत ५ एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर १० एमव्हीएमध्ये रूपांतरित केला आहे. त्यामुळे राजापूर, गुंजाळवाडी आणि वेल्हाळे या गावांतील विजेच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात तोडगा निघाला आहे.

अवश्य वाचा- जिल्ह्यात तूर खरेदीसाठी १२ केंद्रांना मंजुरी

शेतीपंप सुरळीत चालवण्यात अडचणी (Transformer)

गेल्या काही महिन्यांपासून विविध वीज उपकेंद्रांवर अतिरिक्त भार येत असल्याने शेतकऱ्यांना कमी दाबाने व अपुऱ्या प्रमाणात वीजपुरवठा होत होता. परिणामी शेतीपंप सुरळीत चालवण्यात अडचणी निर्माण होत होत्या. ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी महावितरण प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे काही उपकेंद्रांवरील ५ एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर १० एमव्हीए करण्यात आले, तर काही ठिकाणी १० एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर २० एमव्हीए करण्यात आले. या क्षमतेवाढीमुळे ट्रान्सफॉर्मरवरील अतिरिक्त भार कमी झाला असून आता शेतकऱ्यांना मुबलक व सुरळीत वीजपुरवठा मिळू लागला आहे. राजापूर, गुंजाळवाडी आणि वेल्हाळे परिसरातील विजेचा ताण कमी झाल्याने शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत.