नगर : अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काल (ता.२०)डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शपथ घेतली. व्हाईट हाऊसमध्ये (White House) त्यांचा शपथविधी पार पडला.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरुवात करतानाच त्यांनी तृतीयपंथीयांना (Transegender) धक्का दिला आहे.अमेरिकेत आता तृतीयपंथींना शासकीय मान्यता (government recognition)असणार नाही,असा मोठा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. लवकरच ट्रम्प प्रशासनाकडून यासंदर्भातल्या शासकीय आदेशावर स्वाक्षरी केली जाईल,अशी माहिती समोर आली आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात ट्रम्प यांनी याचा उल्लेख केला.
नक्की वाचा : ‘एकनाथ शिंदेंची राजकारणात बिकट अवस्था’- विजय वडेट्टीवार
अमेरिकेत तृतीयपंथीयांना मान्यता नाही (Donald Trump)
तृतीयपंथींचे अधिकार हा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेसह जगभरातला चर्चेचा मुद्दा ठरला आहे. यासाठी अनेक देशांमध्ये तृतीयपंथींकडून आंदोलनंदेखील करण्यात आली आहेत. खुद्द अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात तृतीयपंथींची रद्द केलेली मान्यता जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदी येताच क्रांतिकारी निर्णय म्हणत पुन्हा सुरू केली होती. मात्र ट्रम्प यांचं सरकार येताच पुन्हा या निर्णयात बदल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : कलाविश्वावर शोककळा! अभिनेते योगेश महाजन यांचं हृदयविकाराने निधन
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वातून अमेरिका बाहेर पडत असल्याच्या शासकीय आदेशावर स्वाक्षरी केली आहे. त्याचबरोबर कॅनडा व मेक्सिको या दोन देशांवर अतिरिक्त आयात शुल्क आकारण्याचा निर्णय देखील त्यांनी जाहीर केला.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?(Donald Trump)
“आजपासून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत फक्त स्त्री व पुरुष या दोनच गटांना मान्यता असेल.अमेरिकन सरकारची ही अधिकृत भूमिका असेल”,असं डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केलं आहे. क्रीडा प्रकारांमध्ये तृतीयपंथींच्या समावेशाचा मुद्दा गेल्या काही काळात चर्चेत आला होता. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये देखील काही महिला कुस्तीपटूंनी यासंदर्भात तक्रार केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेण्याआधी काढलेल्या रॅलीवेळी याबाबत भाष्य केलं होतं.“सर्व पुरुषांना महिलांच्या क्रीडाप्रकारांपासून लांब ठेवा”,असं म्हणतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील निर्णयांबाबत सूतोवाच दिले होते.यासंदर्भात इतरही काही निर्णय येत्या काळात अपेक्षित असल्याचं ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात देखील अशाच प्रकारचे निर्णय घेतले होते. त्यानुसार,अमेरिकन लष्करात तृतीयपंथींना रुजू करून घेण्याची प्रक्रिया त्यांनी थांबवली होती. यावेळी या नव्या निर्णयाच्या अध्यादेशावर सही झाल्यानंतर सर्व प्रकारच्या शासकीय कागदपत्रांवर संबंधित व्यक्तीची ओळख म्हणून फक्त स्त्री व पुरुष हे दोनच रकाने असतील.