Trump And Musk : नगर : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी टेस्लाचे प्रमुख एलाॅन मस्क (Elon Musk) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हा वाद इतका वाढला की मस्क यांनी ट्रम्प (Trump And Musk) यांच्यावर महाभियोगाची मागणी केली. यासोबतच त्यांनी उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष (US President) करावे, अशीही मागणी केली. एलाॅक मस्क यांनी ट्रम्प यांना निवडून आणण्यासाठी तब्बल 900 कोटींचा चुराडा केला होता. अशातच , ट्रम्प यांनी मस्क यांच्या कंपन्यांचे सरकारी करार आणि अनुदान (सबसिडी) संपवण्याची धमकी दिली आहे.
इलॉन मस्क आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दरी आणखी वाढली आहे. मस्क यांचे जवळचे सहकारी जेरेड इसाकमन यांचे नाव नासाचे नवीन प्रमुख म्हणून पुढे आले तेव्हापासून ट्रम्प यांनी अचानक या नावाला हरकत घेतली आणि ते दुसरे नाव जाहीर करतील असे सांगितले. हा मस्क यांच्यासाठी राजकीय धक्का होता, कारण इसाकमन यांचे नाव त्यांच्या अंतराळ धोरणांच्या केंद्रस्थानी होते.
नक्की वाचा : गृहकर्ज,वाहन कर्ज स्वस्त होणार;रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला
ट्रम्प यांची मस्कला धमकी
टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांची वृत्ती पाहून अध्यक्ष ट्रम्प यांनी धमकी दिली की मस्कचे अनुदान आणि करार रद्द करून अब्जावधी डॉलर्स वाचवता येतील. हे विधान म्हणजे सरकारचा थेट मस्कवर आर्थिक हल्ला होता, कारण त्यांच्या कंपन्यांना १७ हून अधिक एजन्सींकडून कंत्राटे मिळाली आहेत. या विधानानंतर मस्कने ट्रम्पवरही हल्ला चढवला आणि त्यांनी म्हटले की, ते एपस्टाईन फाइलशी संबंधित अनेक गोष्टी उघड करतील. त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की आता मोठा बॉम्ब टाकण्याची वेळ आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव एपस्टाईनच्या फाइल्समध्ये आहे. म्हणूनच त्या फाइल्स सार्वजनिक केल्या जात नाहीत. भविष्यासाठी ही पोस्ट लक्षात ठेवा, सत्य नक्कीच बाहेर येईल. हे विधान अमेरिकन राजकारणात गोंधळ निर्माण करण्यासाठी पुरेसे होते, कारण जेफ्री एपस्टाईन यांचे नाव लैंगिक गुन्ह्यांशी आणि हाय-प्रोफाइल कनेक्शनशी जोडले गेले आहे.
अवश्य वाचा : विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही, कोल्हापूरच्या नव्या एसपींचा आदेश
मस्क म्हणाले की, (Trump And Musk)
मी नसतो तर ट्रम्प निवडणूक हरले असते. त्यांनी कधीही कृतज्ञता दाखवली नाही. तथापि, या सर्वांमध्ये, ट्रम्प स्पेसएक्स, टेस्ला सारख्या कंपन्यांचे सरकारी करार संपवण्याचा विचार करत आहेत, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत मस्कला मोठा धक्का बसू शकतो. दरम्यान, ट्रम्प यांच्या धमकीमुळे टेस्लाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.