Tuljabhavani Mata : आई तुळजाभवानी मातेच्या पालखीचे पाथर्डीत उत्साहात स्वागत

0
Tuljabhavani Mata : आई तुळजाभवानी मातेच्या पालखीचे पाथर्डीत उत्साहात स्वागत
Tuljabhavani Mata : आई तुळजाभवानी मातेच्या पालखीचे पाथर्डीत उत्साहात स्वागत

Tuljabhavani Mata : पाथर्डी : श्री क्षेत्र तुळजापूर (Shri Kshetra Tuljapur) येथील अवघ्या महाराष्ट्राची (Maharashtra) कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची (Tuljabhavani Mata) पालखी रविवारी (ता.६) सायंकाळी पाथर्डी शहरात दाखल झाली. यावेळी हळद – कुंकू, फुलांची उधळण करत, आई राजा उदो उदो.. कुलस्वामिनी तुळजाभवानी माता की जय, पालखी आई की जय, या जयघोषात जोरदार असे स्वागत करण्यात आले. यावेळी निघालेल्या मिरवणुकीमध्ये हळद कुंकूवाची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आल्याने शहरातील रस्ते हळद कुंकूवाने माखले होते.

Tuljabhavani Mata : आई तुळजाभवानी मातेच्या पालखीचे पाथर्डीत उत्साहात स्वागत
Tuljabhavani Mata : आई तुळजाभवानी मातेच्या पालखीचे पाथर्डीत उत्साहात स्वागत

अवश्य वाचा: बळीराजा माेफत वीज याेजनेची अंमलबजावणी; शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण

पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक

राहुरी येथून श्री क्षेत्र तुळजापूरकडे निघालेल्या बुऱ्हानगर येथील मानाच्या ऐतिहासिक पालखीचे शहारातील आगमन झाले. यावेळी आकर्षक फुलांनी सजवलेल्या मंचावर पालखी विराजमान करण्यात आली. त्यांनतर पालखीचा शृंगार करण्यात येऊन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीची अजंठा चौक, जय भवानी चौक, सुतार गल्ली, कसबा पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शनिमंदिर दरम्यान मिरवणूक काढण्यात आली.

Tuljabhavani Mata : आई तुळजाभवानी मातेच्या पालखीचे पाथर्डीत उत्साहात स्वागत
Tuljabhavani Mata : आई तुळजाभवानी मातेच्या पालखीचे पाथर्डीत उत्साहात स्वागत

नक्की वाचा: विकासकामांच्या आड येणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

ठिकठिकाणी पालखीची विधिवत पूजा (Tuljabhavani Mata)

मिरवणूक मार्गावर महिलांनी सडा रांगोळी करुन, ठिकठिकाणी औक्षण केले, खण नारळाने ओटी भरुन मुक्त हस्ते फुलांची उधळण केली. फटाक्यांची जोरदार आतषबाजी, आई जगदंबेच्या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तीमय होऊन वातावरणात चैतन्य पसरले होते. शनी मंदिर येथे मिरवणूक दाखल झाल्यावर c करुन मिरवणुकीची सांगता झाली. त्यांनतर पालखी मार्गस्थ करण्यात आली. त्यांनतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.