Tuljapur : कर्जत : शहरातील श्री माय मोहर्ताब देवीचा पालखी सोहळ्याचे नवरात्रीच्या पाचव्या माळेला कर्जतहून तुळजापूरकडे (Tuljapur) मोठ्या भक्तिभावाने प्रस्थान झाले. विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदेंच्या (Ram Shinde) पत्नी आशा शिंदे यांच्या हस्ते दुपारची माय मोहर्ताब देवीची आरती करण्यात आली. पालखी सोहळा पुजारी बबन क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली रवाना झाली. विजयादशमीच्या (Vijayadashami) दिवशी तुळजापूर येथील सीमोल्लंघन मिरवणुकीत माय मोहर्ताब देवीच्या पालखी सोहळ्यास अग्रभागी राहण्याचा मान आहे.
नक्की वाचा: दिराने केली दोन भावजयींची कोयत्याने हत्या
चारशे वर्षापासूनची परंपरा
कर्जत येथील श्री माय मोहर्ताब देवीची पालखी सोहळा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सुमारे चारशे वर्षापासूनच ही परंपरा असून तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करताना देवीच्या मूर्तीच्या अग्रभागी कर्जत येथील माय मोहर्ताब देवीला मान दिला जातो. कर्जत येथील पुजारी क्षीरसागर घराण्याला हा मान आहे.
अवश्य वाचा: राहुरीत तनपुरे व कर्डिले यांच्यातच लढतीची शक्यता
मंदिरातून मुखवट्यासह काठीची सवाद्य मिरवणुक (Tuljapur)
सोमवारी (ता.७) नवरात्रीच्या पाचव्या माळेला कर्जतचा पालखी सोहळा दुपारी १ वाजता आरती होत मंदिरातून मुखवट्यासह काठीची कर्जत शहरातून मिरवणुकीने सवाद्य वाजत-गाजत, भंडारा, गुलालाची उधळण करीत तुळजापूरकडे मोठ्या भक्तिभावाने प्रस्थान झाले. यावेळी मोठ्या संख्येने देवीभक्त उपस्थित होते.