Tushar kapoor : तुषार कपूर ‘डंक’मधून करणार ओटीटीवर पदार्पण!

बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर आपल्या एका वेगळ्या अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. तुषार आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

0
Tushar kapoor
Tushar kapoor

नगर : बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर (Tushar Kapoor) आपल्या एका वेगळ्या अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. तुषार आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रेरणा अरोराच्या ‘डंक – वन्स बिटन ट्वीस शाय'(Dunk – Once Bitten Twice Shy’) या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये तुषार कपूर अजिंक्य नावाचे पात्र करत वकिलाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तुषारचे चाहते आनंदी झाले आहेत.

नक्की वाचा : आई व मुलीमधील हळुवार नातं उलगडणार,’मायलेक’ चित्रपटातील’असताना तू’ गाणं प्रदर्शित

‘डंक’ शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणारा चित्रपट (Tushar kapoor)

‘डंक’ बद्दल बोलताना प्रेरणा अरोराने सांगितले की, “डंक शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणारा चित्रपट ठरणार आहे. एक समाज म्हणून आपण जमीन बळकावण्याच्या या धोक्याविरुद्ध एकजुटीने उभे राहिले पाहिजे. गुन्हेगारांना जबाबदार धरले पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांना सशक्त आणि संरक्षण देणाऱ्या धोरणांचा पुरस्कार केला पाहिजे.

उत्तम  कथानक आणि सामाजिक संदेश असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रेरणा अरोराने ‘रुस्तम’, ‘टॉयलेट – एक प्रेम कथा’, राष्ट्रीय विजेते ‘पॅडमॅन’, ‘परमानु: द स्टोरी ऑफ पोखरण’ यासारखे यशस्वी चित्रपट केले आहेत. तुषार कपूर व्यतिरिक्त या चित्रपटात निधी अग्रवाल, शिविन नारंग, सुचित्रा कृष्णमूर्ती आदी प्रमुख भूमिकेत आहेत. ‘डंक’ व्यतिरिक्त, प्रेरणा अरोरा तेलगू चित्रपट ‘हीरो हिरोइन’ ची निर्मिती करत आहे. ज्यात दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत आहे.

हेही पहा : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; चांद्रयान-३ मोहिमेसाठी इस्रोला मिळाला ‘हा’ पुरस्कार

अभिनेता तुषार कपूरने ‘गोलमाल २’, ‘खाकी’ आणि ‘शूट आऊट एट वडाला’ या चित्रपटामध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. आता तो डंक मध्ये दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here