Twist : नगरमधील साडेबारा एकर भूखंडाला आणखी वेगळे वळण

0
Twist

Twist : नगर : सर्वाेच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार भाेसले आखाडा, माणिकनगर या मध्यवस्तीतील साडेबारा एकर भूखंड (Twelve and a half acres of land) मूळ मालकाला देण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. परंतु, बुऱ्हाण बाबुमियाँ सय्यद व जावेद बुऱ्हाण सय्यद यांनी या जागेवर आपल्या पूर्वजांचा दावा करुन या जमीनीची सन १८८६ पूर्वी पासूनची सनद (कैफियत) स्वत: जवळ असल्याचे स्पष्ट केले आहे. तर इनामी वर्ग दोनचा एकमध्ये वर्ग करुन न्यायालयाची दिशाभूल करण्यात आली आहे, असा आरोप प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे साडेबारा एकर भूखंडाला आणखी वेगळे वळण (Twist) लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Twist

नक्की वाचा: मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यात बंदची हाक

शहरात एकच चर्चेचा विषय (Twist)

सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाने साडेबारा एकर भूखंड मूळ मालकांना देण्याचे आदेश दिले. त्यानंतर नगर शहरात एकच चर्चेचा विषय रंगला हाेता. मात्र, आता सय्यद यांनी मालमत्ताधारकांनी स्वत:ला मूळ मालक सांगणाऱ्यांशी आर्थिक व्यवहार करु नये. या भूखंडाबाबत पुराव्यानिशी न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या जागेच्या प्रकरणात ३०० मालमत्ता धोक्यात आलेल्या असताना आणखी गुंता वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, १९७७ पासून न्यायप्रविष्ठ असलेल्या या भूखंडाचा निकाल नुकताच लागलेला आहे. जागेचे वाटप करण्यासाठी ओपन स्पेस, रस्त्याची हद्द निश्‍चित करुन येथील काही रहिवासींना जागा खाली करण्याचा नोटिसा देण्यात आल्या आहे. सय्यद यांनी या भूखंडाबाबत लॅण्ड इलिगेशनला जात इनामची नोंद आहे. सन १९०९ पर्यंत टिप्पन बुकमध्ये खातेदार म्हणून आमचे पूर्वज मियाँ भाई व मदन भाई यांची नोंद असल्याचे म्हटले आहे.

हे देखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रात एकही सभा होऊ देणार नाही; मराठे काय आहे हे १५ तारखेनंतर पाहा, मनोज जरांगेंचा इशारा.

जमीन इनाम वर्ग दोन (Twist)


सन १९१६ सालापासून वाटणी पत्रामुळे पोट हिस्से तयार झाले आहे. त्यामध्ये हस्तांतर झाले. कसे व कोणी दिलेले आहे? ते आढळून येत नाही. त्यांनी कब्जेदार म्हणून वेगवेगळी फाळणी वाटणी पत्र तयार केलेले आहे. लॅण्ड इलिगेशनमुळे सिद्ध होत आहे की, ही जमीन इनाम वर्ग दोन आहे. आमच्याकडे वडिलोपार्जित सनद (कैफियत) आहे. या गट नंबरमध्ये सरकारी नजराणा भरल्याची कुठलीही नोंद आढळत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या तोंडी आदेशाने १९५४ साली वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये खालसा झाली आहे. १८८६ ते १९०९ पर्यंत खातेदार आमचे पूर्वज आहे. आमच्या जमिनीवरील कसबदार यांनी कब्जादार म्हणून नोंद घेतली. त्यांच्या मृत्यूनंतर कसबदारचे वारसांची नोंद जमिनीवर वारसदार म्हणून केला असल्याचा खुलासा सय्यद यांच्या वतीने करण्यात आला आहे. तर हे प्रकरण न्यायालयात दाखल करुन न्याय मागितला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here