Two Children Killed on the Spot : श्रीगोंद्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ट्रॅक्टर पलटी होऊन दोन चिमुकले जागीच ठार

Two Children Killed on the Spot : श्रीगोंद्यातील कुटुंबावर काळाचा घाला; ट्रॅक्टर पलटी होऊन दोन चिमुकले जागीच ठार

0

Two Children Killed on the Spot : श्रीगोंदा : तालुक्यातील उक्कडगाव येथे जनावरांचा चारा आणण्यासाठी घेऊन गेलेल्या ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर खाली दबलेल्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची (Two Children Killed on the Spot) घटना श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे बुधवारी (ता.२६) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रॅक्टर चालविणारी मुलांची आई आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाले.

नक्की वाचा : डिजिटल अरेस्ट ऑनलाईन फसवणूक प्रकरणात तिघे जेरबंद

चारा आणण्यासाठी जाताना सोबत हाेती मुले

प्राप्ती किरण महाडिक (वय १०), शिवांश किरण महाडिक (वय ४) असे मयत झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत तर कावेरी किरण महाडिक (वय ३५) आणि क्रांती किरण महाडिक असे जखमी झालेल्या माय लेकरांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील कावेरी किरण महाडिक या जनावरांचा चारा संपल्याने शेतातून चारा आणण्यासाठी बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर घेऊन गेल्या. सोबत त्यांची मुले प्राप्ती महाडिक, शिवांश महाडिक आणि क्रांती महाडिक यांना घेऊन गेल्या होत्या.

अवश्य वाचा: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून बेदम मारहाण; श्रीरामपूर शहरात खळबळ

ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी (Two Children Killed on the Spot)

चारा घेऊन माघारी येत असताना किरण महाडिक यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला. यावेळी पलटी झालेल्या ट्रॅक्टरखाली तीन मुले आणि कावेरी महाडिक दबल्या गेल्या. या अपघातात प्राप्ती महाडिक आणि शिवांश महाडिक यांचा दवाखान्यात घेऊन जात असताना मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर चालवत असलेल्या कावेरी महाडिक आणि क्रांती महाडिक या दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेने उक्कडगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.