Uttar Pradesh Crime:बापरे!उत्तर प्रदेशमध्ये दोन चिमुकल्यांची गळा चिरून हत्या

उत्तर प्रदेशातील बदायूतील बाबा कॉलनीमध्ये राहणाऱ्या दोन लहान मुलांची हत्या करण्यात आलीये, तर एक चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.

0
Uttar Pradesh Crime
Uttar Pradesh Crime

नगर : उत्तर प्रदेशातील बदायूंमधून (Budaun) एक गंभीर घटना समोर आली आहे. येथील बाबा कॉलनीमध्ये राहणाऱ्या दोन लहान मुलांची हत्या (Murder) करण्यात आली आहे. या घटनेत एक चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. आरोपीने मुलांची हत्या करुन तेथून पळ काढला. पोलिसांना याची माहिती कळताच त्यांनी आरोपीचा पाठलाग केला. यात आरोपीचा एनकाऊन्टर झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

नक्की वाचा : आला रे आला बिबट्या आला, कधी हल्ले, तर कधी हुलकावणी; ‘या’ परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण होऊन काही गाड्यांची संतप्त जमावाने तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. बदायुंचे डीएम मनोज कुमार यांनी यासंदर्भातील अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, घटनेची माहिती मंडी समिती पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. एका व्यक्तीने घरात घुसून ११ आणि ६ वर्षांच्या दोन मुलांची हत्या केली आहे, तर एकाला गंभीर जखमी केलं आहे.

मुलांच्या हत्येचं कारण गुलदस्त्यात (Uttar Pradesh Crime)

दोन्ही मुलांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तर या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  या आरोपीने या मुलांची हत्या का केली याच कारण अजून समोर आलेले नाही. बरेलीचे आयजी राकेश कुमार यांनी यासंदर्भात सांगितलं की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली होती. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याने गोळीबार सुरु केला. कारवाईमध्ये आरोपीचा मृत्यू झालाय. आरोपी २५ ते ३० वर्षे वयाचा आहे.

नेमकं काय घडलं ? (Uttar Pradesh Crime)

मंगळवारी (ता. १९) रात्री आठ वाजता साजिद नावाचा एक व्यक्ती आपल्या दुकानासमोर असलेल्या विनोद सिंह यांच्या घरी गेला. त्यांच्या पत्नीला चहा करण्यास सांगितलं. अचानक त्याने तीन मुलांची कुऱ्हाडीने हत्या केली. आरोपीने हे पाऊल का उचललं हे कळू शकलेलं नाही. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी आज (ता. २०)सकाळी पीडितांच्या घरी जाऊन पाहणी केली आहे.

अवश्य वाचा : कर्जत एमआयडीसीचा प्रश्न पुन्हा न्यायालयात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here