Two-Wheeler Theft : नगर : अहिल्यानगर शहरासह (Ahilyanagar City) जिल्ह्यात दुचाकीची चोरी (Two-Wheeler Theft) करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून चार दुचाक्या असा एकूण एक लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर
ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव
सुनील दत्तात्रय आजबे (वय २९, रा. प्रेमदान हडको, सावेडी, अहिल्यानगर, मुळ रा. देवटाकळी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हनुमंत अंकुश झाडे (रा.सामनगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर)( पसार) याचे मदतीने दुचाकी चोरी केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या.
अवश्य वाचा : संग्राम भंडारे महाराजांना संरक्षण द्या; भाजपच्या तिनही जिल्हाध्यक्षांची मागणी
आरोपीला चोरीच्या मुद्देमालासह घेतले ताब्यात (Two-Wheeler Theft)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार चोरी केलेली दुचाकीची विक्री करण्यासाठी सुनील आजबे हा अहिल्यानगर शहरातील ताराकपूर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. अधिक तपासासाठी संशयित आरोपीला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, शाहिद शेख, राहुल द्वारके, फुरकान शेख, प्रकाश मांडगे, विशाल तनपुरे, सतीश भवर, प्रशांत राठोड, अरुण मोरे यांच्या पथकाने केली.