Uday Shinde : शासनाच्या शाळा बंद धोरणाला समाजाने तीव्र विरोध करावा – उदय शिंदे

Uday Shinde : शासनाच्या शाळा बंद धोरणाला समाजाने तीव्र विरोध करावा - उदय शिंदे

0
Uday Shinde : शासनाच्या शाळा बंद धोरणाला समाजाने तीव्र विरोध करावा - उदय शिंदे
Uday Shinde : शासनाच्या शाळा बंद धोरणाला समाजाने तीव्र विरोध करावा - उदय शिंदे

Uday Shinde : पारनेर : शासनाच्या शाळा बंद धोरणाला (Government Policy on School Closures) समाजाने तीव्र विरोध करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे (Uday Shinde) यांनी केले. पारनेर येथील सुगंधाबाई स्मारकात शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशन प्रसंगी व्यक्त ते बाेलत हाेते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर होते. यावेळी समितीचे राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी यांची पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Parner Taluka Agricultural Produce Market Committee) संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार उदय शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

नक्की वाचा : जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच

यावेळी बोलताना उदय शिंदे यांनी सांगितले की,

शाळांच्या संच मान्यतेच्या नावाखाली शाळा बंद करण्याचे शासनाचे धोरण आहे. यामुळे समाजातील गोरगरीब मुलांचे शिक्षण बंद होणार असून त्यांना शिक्षण मिळणार नाही. पर्यायाने समाजात अराजकता माजवण्याचा शासनाचा डाव आहे. समाजाने हे वेळीच ओळखून या धोरणाला तीव्र विरोध करावा. तसेच टीईटीच्या नावाखाली शिक्षकांच्या सेवा धोक्यात घालून शिक्षकांना बेरोजगार बनविणे हे शासनाचे धोरण आहे. या अशा प्रवृत्तीला राज्य शिक्षक समितीचा तीव्र विरोध आहे. प्रसंगी शिक्षक समिती या प्रश्नांवर तीव्र आंदोलन करेल.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

रा. या. औटी यांच्या कार्याचा गुणगौरव (Uday Shinde)

यावेळी शिंदे यांनी रा. या. औटी यांच्या कार्याचा गुणगौरव केला. औटी यांनी शिक्षक संघटनेत, बँकेमध्ये, सहकारात व समाजामध्ये प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्यांना बाजार समिती मध्ये काम करण्याची संधी मिळाली. शिक्षकांप्रमाणेच ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांनाही न्याय मिळवून देतील असा विश्वास उदय शिंदे यांनी व्यक्त केला. अध्यक्षपदावरून बोलताना राजन कोरगावकर यांनी राज्य शिक्षक समितीची संघटनात्मक वाटचाल, समितीची पुढील धोरणे यावर सविस्तर विवेचन केले.

या प्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब तरटे, शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष बा. ठ. झावरे, शिक्षक समितीचे नाशिक विभागीय अध्यक्ष संजय धामणे, जिल्हाध्यक्ष सीताराम सावंत, अंबादास झावरे, तबाजी सासवडे, गणपत देठे, दत्तात्रय रेपाळे, बाळासाहेब गोल्हार, रावसाहेब दरेकर यांची भाषणे झाली. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा सरचिटणीस विजय महामुनी, पाथर्डी तालुकाध्यक्ष आण्णासाहेब आंधळे, नगर तालुकाध्यक्ष सुभाष धामणे, माजी अध्यक्ष दिनकर ढोकळे, सोपान राऊत, पी. डी. बर्वे, प्रमोद झावरे, सुभाष यादव, संभाजी पठारे, महादेव शिर्के, शगूफा शेख, कमल नरसाळे, सरिता औटी, आशा फलके, कमल साठे, रंजना पवार, मच्छिंद दिवसे, युवराज हिलाळ, संजय रेपाळे, रोहीदास वाबळे, रामदास बोरुडे, रामदास गाढवे, शिवाजी काकडे, मारुती खोसे, भास्कर औटी, मोहन भालेकर, भास्कर खैरे व नगर, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यातील अनेक शिक्षक उपस्थित होते .

यावेळी सद्‌भावना विचार मंचचे गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याचा वर्गशिक्षकांचा व पालकांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी पुढील तीन वर्षांसाठी शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी मच्छिंद्र दिवसे व महिला आघाडीच्या अध्यक्षपदी आशा फलके मॅडम सहीत इतर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाचे स्वागत माजी अध्यक्ष जयप्रकाश साठे, सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी औटी यांनी केले. शेवटी आभार सोपान राऊत यांनी मानले.