Uddhav Thackeray : ‘महाराष्ट्र बंद मागे’ उद्धव ठाकरेंकडूनही घोषणा

Uddhav Thackeray : 'महाराष्ट्र बंद मागे' उद्धव ठाकरेंकडूनही घोषणा

0
Uddhav Thackeray : 'महाराष्ट्र बंद मागे' उद्धव ठाकरेंकडूनही घोषणा
Uddhav Thackeray : 'महाराष्ट्र बंद मागे' उद्धव ठाकरेंकडूनही घोषणा

Uddhav Thackeray : नगर : बदलापूर घटना तसेच राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने उद्या महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली होती. परंतू महाराष्ट्र बंदच्या (Maharashtra Bandh) निर्णयावर उच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना कुठलाही बंद पुकारता येत नाही, असे निर्देश देत उद्याचा बंद मागे घेण्याचेही न्यायालयाने आदेश दिले होते. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या उद्याच्या बंदबाबत भूमिका जाहीर करत आपण हा बंद मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही भूमिका मांडत उद्याचा बंद मागे घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

Uddhav Thackeray

नक्की वाचा: लाडक्या बहिणींना सन्मानाने त्यांचा हक्क दिला जात आहे : गोऱ्हे

कारवाई करण्याचे न्यायालयाचे सरकारला निर्देश

बदलापुरातील अत्याचारप्रकरणानंतर मविआ आक्रमक झाली आहे. याचाविरोधात उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती. याविरोधात वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर निर्णय देतांना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलंय की कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचं जर कोणी बंद केला तर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिलेत.

अवश्य वाचा: बदलापूरच्या आंदोलनात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात पोस्टर्स आले कसे?;मुख्यमंत्र्यांचा सवाल

बंदऐवजी एक तासभर राज्य सरकारचा निषेध (Uddhav Thackeray)

शरद पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांच्याकडून उद्या (ता. २४) सकाळी पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसून सकाळी 10 ते 11 या वेळेत सहवेदना व्यक्त करण्यात येणार आहेत. येथे एक तास बसून बदलापूर घटनेचा निषेध नोंदविण्यात येईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही बंदबाबत भूमिका जाहीर केली असून बंदऐवजी एक तासभर राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

न्यायालयाच्या निर्याणयाबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की
आंदोलन करण्याचा अधिकार राहिला की नाही, न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, परंतू न्यायालयाचा आदर राखला पाहिजे, म्हणून आम्ही उद्याचा बंद मागे घेत आहोत. पण, उच्च न्यायालयाने बंदबाबत जितक्या तत्परतेने निर्णय घेतला, तितक्याच तत्परतेने गुन्हेगारांना शिक्षा द्यावी, अशी मागणीपर विनंती उद्धव ठाकरेंनी न्यायालयाकडे केली आहे. तसेच, मी स्वत: सकाळी 11 वाजता शिवसेना भवनातील चौकात काळी फीत बांधून आंदोलनाला बसणार आहे. राज्यभरात मविआचे कार्यकर्ते तोंडाला काळी फीत बांधून राज्यभर आंदोलन करतील, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here