Uddhav Thackeray : श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात (Shrigonda Assembly Constituency) एक साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेले अपक्ष उमेदवारांना भविष्यात सहकार वाचवायचा असेल केंद्र सरकारचा (Central Government) मनसुबा हाणून पडायचा असेल तर महाविकास आघाडीला अपशकून करू नये, असा इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला.
नक्की वाचा : “मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही”- देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडीतर्फे श्रीगोंदा येथे सभेचे आयोजन
अनुराधा नागवडे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीतर्फे श्रीगोंदा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री फौजिया खान, मिलिंद नार्वेकर, सुभान अली, घनःश्याम शेलार, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, विक्रम राठोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : डाळ मंडई ही महाराष्ट्रातील अग्रेसर बाजारपेठ : संग्राम जगताप
उद्धव ठाकरे म्हणाले की, (Uddhav Thackeray)
दिल्लीतील भाजप नेत्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही. त्यांना शेतमालाचे बाजार भाव वाढवा म्हटले की ते सांगतात काश्मीरचे 370 कलम हटवले. मुंबई जशी त्यांनी अदानी अंबानींच्या ताब्यात देण्याचा घाट घातला तशीच अवस्था राज्यातील सहकार क्षेत्र, सहकारी बँकचे होणार आहे. हे टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आणा. कुटुंब प्रमुख म्हणून सर्व प्रश्न सोडवून लोकांना न्याय देऊ, असे त्यांनी आश्वस्त केले.
लाडकी बहीण योजना बाबत बोलताना ठाकरे म्हणाले, लोकसभा नंतर यांना बहीण आठवली एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे कर्नाटकात भाजप व्यासपीठावर अत्याचार करणारी व्यक्ती वावरते यातून यांची महिला प्रति आस्था ओळखा. अनुराधा नागवडे यांना विजयी करा. मतदार संघातील डिंभे माणिकडोह बोगदा, साकळाई उपसा जलसिंचन योजना, एमआयडीसी आदी प्रश्न सोडवू. विरोधक विजयी झाला तर मात्र, धरणाजवळ बोगदा नाही तर आयुष्याला भगदाड पडल्याशिवाय राहणार नाही. हा धोका ओळखा, असे सांगत शेतकऱ्यांना भाव वाढवून देऊ तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेऊ असे सरकार देणार,महिलांना 3 हजार रुपये, महिलांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे,मुली प्रमाणे मुलांना मोफत शिक्षण देऊ आदी घोषणा त्यांनी केल्या.
खासदार फौजिया खान यांनी बोलताना अपक्ष उमेदवाराने खासदार शरद पवार यांचा फोटो प्रचारात वापरणे चुकीचे असून यापुढे वापरू नये तसेच लोकांनी कार्यकर्त्यांनी संभ्रम न ठेवता महाविकास आघाडी उमेदवार विजयी करावे, असे आवाहन केले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलताना कुकडी कारखाना उभारणीस मला तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी विचारले, मी त्यांना स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांना पाठिंबा देण्यास सांगावे लागेल असे सांगून नागवडे यांनी पाठिंबा दिला. म्हणून कुकडी कारखाना सुरु झाला पुढे राहुल जगताप यांना नागवडे यांनी पाठिंबा देऊन आमदार केले. ते आज अपक्ष निवडणूक लढवत आहेत, याचे आश्चर्य वाटले. भाजप उमेदवारावर तब्बल ३० गुन्हे आर्थिक बाबीशी संबंधित आहेत, असे त्यांनी सांगितले.