Uddhav Thackeray : नगर : महाराष्ट्रातील राजकारणात दोन्ही पवार आणि ठाकरे यांच्या मनोमिलनावर खिळले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंची (Raj Thackeray) साद, आणि त्याला अवघ्या काही तासात शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिलेला प्रतिसाद, त्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलेली सकारात्मक विधानं पाहता ठाकरे बंधूंकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) दोन्ही ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे. त्यामुळे आता ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र येणार का, ते पाहणं महत्त्वाचं आहे.
नक्की वाचा : बापरे! कोल्हापूरातील धार्मिक संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्याची शॉक देऊन हत्या
शिवसेना भवनात निवडणूक कार्यालय उघडणार
गेल्या दोन महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा जोरात सुरु आहेत. मनसेसोबतच्या संभाव्य युतीसंदर्भात आज उद्धव ठाकरेंनी मुंबईतील त्यांच्या माजी नगरसेवकांकडे विचारणा केली. मुंबई महापालिकेतील पक्षाच्या माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक झाली. त्यावेळी ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात. येत्या काळात अनेक बैठका घ्यायच्या आहेत. माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन येथे येऊन सामान्यांचे प्रश्न सोडवावेत. शिवसेना भवनात निवडणूक कार्यालय उघडणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. येत्या ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत निवडणूक लागू शकते असा अंदाज उद्धव ठाकरेंनी बैठकीत व्यक्त केला.
अवश्य वाचा : निराधार बालकांना आधार कार्ड मिळणार
नगरसेवकांचा सकारात्मक प्रतिसाद (Uddhav Thackeray)
मनसे सोबत युती करायची की नाही, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांची माजी नगरसेवकांकडे केली. त्यावर युती केली तर फायदाच होईल, असा माजी नगरसेवकांचा सूर होता. मुंबईत युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याची कबुली माजी नगरसेवकांनी ठाकरेंसमोर दिली. मुंबई महानगर पालिकेसाठी आपल्याला ज्या पक्षासोबत युती करायची, त्याबद्दल तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेईन, असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना दिलं.