Uddhav Thackeray : एक कोण तो बाप ठरवा पहिल्यांदा; बाप वक्तव्याचा उद्धव ठाकरेंकडून ठाकरी शैलीत समाचार

Uddhav Thackeray : एक कोण तो बाप ठरवा पहिल्यांदा; बाप वक्तव्याचा उद्धव ठाकरेंकडून ठाकरी शैलीत समाचार

0

Uddhav Thackeray : नगर : मुंबईमध्ये शिवसेनेचा (उबाठा) (Shiv Sena (UBT)) 59 वा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा मोठ्या दिमाखात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी (Election) सज्ज असल्याचे जाहीर करून विरोधकांना आव्हान दिले आहे.

नक्की वाचा : करंजी घाटात विचित्र अपघात; ट्रकची एकाच वेळी पाच वाहनांना धडक, दोघे गंभीर जखमी

हिंदी सक्तीची होऊ देणार नाही

विरोधकांवर टीका करताना त्यांनी पंतप्रधान देशाचे आहेत की भाजपचे? असा प्रश्न उपस्थित केला. देशाला आज गृहमंत्र्यांची गरज आहे, घरफोड्या अमित शाहांची नाही. देशाला संरक्षणमंत्र्यांचीही गरज आहे, गुंडांना अभय देणाऱ्या राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीसांची नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. हिंदी विषयाची पहिलीपासून केलेल्या सक्तीच्या विरोधात बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रात हिंदीची सक्ती कदापि होऊ देणार नाही. हिंमत असेल तर गुजरातमध्ये सक्ती करून दाखवा, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठणकावले.

Uddhav Thackeray : एक कोण तो बाप ठरवा पहिल्यांदा; बाप वक्तव्याचा उद्धव ठाकरेंकडून ठाकरी शैलीत समाचार
Uddhav Thackeray : एक कोण तो बाप ठरवा पहिल्यांदा; बाप वक्तव्याचा उद्धव ठाकरेंकडून ठाकरी शैलीत समाचार

अवश्य वाचा : अनधिकृत खतांच्या साठ्यावर कृषी विभागाचा छापा

नितेश राणेंची उडवली खिल्ली (Uddhav Thackeray)

मंत्री नितेश राणे नेहमी उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी व वैयक्तिक टीका करत असल्याने तिन्ही त्यांचाही समाचार घेतला. त्यांच्या बाप वक्तव्याचा सुद्धा त्यांनी ठाकरी शैलीत समाचार घेत एक कोण तो बाप ठरवा पहिल्यांदा असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सध्या हिंदू-मुस्लिम भांडणे लावली जात आहेत. भाजपचा एक बेडूक ओरडत आहे. त्याला तेवढंच काम दिलेलं आहे. तुझी उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावताच एकच हशा पिकला. डोळे कोणासारखे आहेत माहीत नाही, त्यावर पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, तुझा जीव काय, तू बोलतोस काय? तुझी पार्श्वभूमी काय? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? आणि शिवसेनेवर बोलतोस. पुढे बोलताना कोणता तरी एक बाप ठरवा, याच भाषेत मी त्यांना बोलतोय हे त्यांना कळू द्या. शिवसेना 59 वर्षांची झाली. तरीही आमचा नेता एकच. भगवा एकच, दैवत, विचार एकच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.