Uddhav Thackeray : नगर : “ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काही संबंध नव्हता, त्यांच्या पदरात पुन्हा भारतमाता टाकणार का? ते जर टाकायचं नसेल, तर इथून फक्त आपल्या शिवसेनेलाच मतदान करा. विराेधकांची शिवेसना (Shivsena) मी मानत नाही. कोणीतरी उठायचं आणि माझ्या आजोबांनी पक्षाला दिलेलं नाव त्यांना द्यायचं. त्यामुळे लोकशाहीच्या अधिकारात मी निवडणूक आयोगाचं नावच बदलतो. आजपासून निवडणूक आयाेगाचं (Election Commission) नाव हे धोंड्या असणार आहे,” अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.
हेही वाचा : २४ तारखेपासून राज्यभर रास्ता रोको; मराठा आंदोलनाची पुढची दिशा
उद्धव ठाकरेंचं आवाहन (Uddhav Thackeray)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज्यभर दौऱ्यांना सुरुवात केली आहे. त्यानिमित्ताने ते बुलढाण्यात होते. बुलढण्यातील जनतेशी संवाद साधताना त्यांनी माता जिजाऊंचाही उल्लेख केला. तसंच, सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही आणि एकाधिकारशाही उलथवून लावण्यासाठी एकत्र या, असं आवाहनही त्यांनी केलं.
अवश्य वाचा : ‘मनोज जरांगे मारुतीचं शेपूट; तो शांत बसणार नाही’: छगन भुजबळ
अन्यायाविराेधात लढण्याची जिद्ध (Uddhav Thackeray)
ठाकरे म्हणाले, “ बुलढाणा आपण म्हणतो की सिंदखेड राजा म्हणजे जिजाऊंचं जन्मस्थान. जिजाऊंनी आपल्याला एवढं मोठं दैवत दिलं, त्यांना आपण विसरलो. अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द ज्या दैवताने दिली. त्यांचं मातृस्थान या जिल्ह्यात आहे. भाजपावाले जे म्हणताय की ते घराणेशाहीच्या विरुद्ध आहेत, पण आम्ही तुमच्या एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीच्याविरोधात आहोत. मुख्यमंत्री पद म्हणजे बीसीसीआयचं अध्यक्षपद नाही, की तुम्ही जसं तिथे जय शाहाला बसवलं. माझं घराणं अगदी प्रबोधनकारांपासून महाराष्ट्रासमोर आहे. अमित शाह, तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे? जय शाह विराट कोहलीचा प्रशिक्षक होता का? मुंबईमधील मॅच अहमदाबादला नेणं एवढंच त्याचं कर्तृत्त्व?”, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.