Uddhav Thackeray : अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषक हरला; उद्धव ठाकरे यांचा पलटवार

Uddhav Thackeray : अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषक हरला; उद्धव ठाकरे यांचा पलटवार

0
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषक हरला; उद्धव ठाकरे यांचा पलटवार

Uddhav Thackeray : नगर : काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यातील सभेत बोलताना अमित शाह (Amit Shah) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना पक्ष फुटला, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या टीकेला उत्तर देतांना उद्धव ठाकरे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिले आहे. तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारतीय क्रिकेट संघ विश्वचषक (World Cup) स्पर्धेत अंतिम सामना हारला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना लगावला. मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी अमित शहांच्या टीकेला उत्तर दिले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : अमित शाह यांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषक हरला; उद्धव ठाकरे यांचा पलटवार

हे देखील वाचा: ‘गोळी मारायची धमकी देणाराही पारनेरचा आणि वाचविणाराही पारनेरचा’: सुजय विखे

काय म्हणाले होते अमित शाह (Uddhav Thackeray)

अमित शाह यांनी भंडाऱ्यातील सभेत म्हटले होते की, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार सातत्याने भाजपने आमचा पक्ष फोडला, असे म्हणत असतात. पण मला स्पष्ट सांगायचे आहे की, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष भाजपने फोडले नाहीत. उद्धव ठाकरे यांचं पुत्रप्रेम आणि शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फुटले”, असे अमित शाह म्हणाले होते.

नक्की वाचा: साईबाबा मंदिर परिसरात ‘नो पार्किंग झोन’ घाेषित

गुजरातमधील अंतिम सामन्याच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह (Uddhav Thackeray)

या वक्त्यव्याविषयी उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेत विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी मिश्कील शैलीत अमित शाह यांना टोला लगावला. त्यांनी म्हटले की, मला अमित शाह यांना सांगायचं आहे की, तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरला आहे. मी तसं पुत्रप्रेम दाखवलं नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. अमित शाह यांचे पुत्र जय शहा हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष आहेत. गेल्यावर्षी भारतात एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना शक्यतो मुंबई, दिल्ली किंवा कोलकाता येथील मैदानांवर होतो. मात्र, ही परंपरा मोडीत काढत बीसीसीआयने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याचे आयोजन गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर केले होते. या निर्णयावर अनेकांनी प्रश्नही उपस्थित केले होते.

देवेंद्र फडणवीस यांनाही टोला
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे अमित शाह यांचा चेला म्हणून संबोधले. त्यांनी म्हटले की, अमित शाह यांचं पक्षातील स्थान नक्की काय आहे? भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांना किती अधिकार असतात, हे सर्वांना माहिती आहे. अमित शाह जे बोलतात त्यामध्ये आणि त्यांच्या चेलेचपाट्यांच्या वक्तव्यामध्ये एकवाक्यता ठेवली पाहिजे. तुम्ही सांगता की आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही फोडले नाहीत. पण देवेंद्र फडणवीस बोलतात की, मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. अमित शाह यांची लाज त्यांचे चेलेचपाटे काढत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here