Uddhav Thackeray : देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर उभा : ठाकरे

Uddhav Thackeray : देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर उभा : ठाकरे

0
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर उभा : ठाकरे

Uddhav Thackeray : श्रीरामपूर : देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर असताना संपूर्ण देशामध्ये हुकूमशाहीविरुद्ध आगडोंब पेटला असताना तुम्ही लोकशाहीला अपशकुन करू नका. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) लिहिलेले संविधान (Constitution) वाचवण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. मोदीजी तुम्ही माझ्याशी लढा, तुम्ही माझ्या आईवडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही. तुम्ही कोणी असाल तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदींवर टीका केली.

हे देखील वाचा: ११ वर्षांनंतर दाभोळकर प्रकरणाचा निकाल; दोन आरोपींना जन्मठेप, तर तिघे निर्दोष

भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ सभा (Uddhav Thackeray)

येथील थत्ते मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार लहू कानडे, आमदार शंकरराव गडाख, नीतीन देशमुख, सुनील शिंदे, शुभांगी पाटील, करण ससाणे, हेमंत ओगले, अरुण नाईक, संजय फंड, सुधीर नवले, संदीप वर्पे, अशोक गायकवाड, रावसाहेब खेवरे, सचिन बडदे, संजय छल्लारे, अशोक कानडे, बाबासाहेब दिघे, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, मल्लू शिंदे, अंजुम शेख, मुक्तर शाह, वंदना मुरकुटे आदी उपस्थित होते.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

नक्की वाचा: बहुरुपी उमेदवारावर विश्वास ठेवू नका, अन्यथा पस्तावा करण्याची वेळ : धनंजय मुंडे

ठाकरे म्हणाले (Uddhav Thackeray)

मोदी जिथे जातात तिथे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे दिसतोय. तेलंगणामध्ये गेले तेथेही माझ्यावर टीका केली. आहो मी महाराष्ट्रात तुमच्याविरुद्ध उभा आहे. आमचं हिंदुत्व हे पितृदेवो भव, मातृदेवो भव, गुरुदेव भव हे सांगणारं आहे. बाळासाहेब, बाळासाहेब बोलण्यापूर्वी हिंदूहृयसम्राट लावायला शिका नाहीतर मी तुम्हाला शिकवणी लावतो. आपल्या विरोधातली मत नासवायची कशी हे भाजपला चांगलं कळतंय आणि मला खात्री आहे की ही लढाई तिरंग्यासाठी, लोकशाहीसाठी आहे. हे जे लोकशाही संपवायला निघालेत, त्या हुकुमशाविरुद्धचे एक सुद्धा मत हे नासता कामा नये. निळवंडे धरण ५० वर्षे रखडल्याचे सांगता. या ५० वर्षात अटलजींचे, देवेंद्र फडणवीसांचेही सरकार होते. तसे महाविकास आघाडी सरकारच्या काळातही ह्या धरणासाठी निधी दिला आहे. मात्र, धरणाच्या उद्घाटनाला मोदींची तारीख मिळत नव्हती म्हणून टेस्टिंगच्या नावाखाली माझ्या शेतकऱ्याचं पीक करपवून टाकली होती. कांदानिर्यात बंदीमुळे जवळपास ११०० कोटींचे नुकसान तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे केले आहे. निर्यातबंदी झाल्यामुळे जो काय भाव पडला त्या भावाचे पैसे माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात का नाही टाकले. मी टाकले होते, तसेच शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे पीक कर्जही आपल्या महाविकास आघाडीने माफ केलं होतं.  हे सरकार पाच वर्षे राहिले असते तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्त केले असते.


थोरात म्हणाले, मोंदीनी ७० हजार कोटींचा  भ्रष्टाचाराचा आरोप केला. दुसऱ्या दिवशी अजित पवार तिकडं गेले आणि स्वच्छ झाले. तीन पक्षाचे हे सरकार आलं. तिघांचं एकही निर्णय व्यवस्थित झालेला नाही. आमदार पोलीस स्टेशनला गोळीबार करायला लागले. अंमली पदार्थ विद्यार्थ्यांच्या हातात जायला लागले. हजारो कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडले गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here