Uddhav Thackeray : नगर : आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाचा शिव संकल्प मेळावा पुण्यात पार पडला. यावेळी बोलताना अहमद शाह अब्दाली याचा राजकीय वंशज अमित शाह (Amit Shah) हे होय. अशा प्रखर शब्दात उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्या पुण्यातील (Pune) सभेवर भाष्य करताना टीका केली आहे.
नक्की वाचा: श्रीरामपूर खून प्रकरणात दोन आरोपी १२ तासांत गजाआड
मेळाव्यातील पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांनी केले संबोधित
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, भास्करराव जाधव, सुषमा अंधारे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यातील पदाधिकाऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आजपासून मी अमित शाहला अहमद शाह अब्दालीच म्हणणार. ते मला नकली संतान म्हणतात, औरंगजेब फॅन क्लब म्हणतात तर मी देखील त्यांना अहमद शाह अब्दालीच म्हणणार. तो अहमद शाह अब्दालीच आहे. त्याला घाबरायचे कारण नाही. ज्या पद्धतीनं औरंगजेबाची इथे कबर बांधली तशीच भाजपची राजकीय कबर बांधा. अशा प्रखर शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केलीय.
अवश्य वाचा: मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया
हिंदुत्वाच्या मुद्द्याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले की, (Uddhav Thackeray)
नवाब शरीफ यांचा केक खाणारे तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवणार? ज्याप्रमाणे शंकराचार्य म्हणाले की, विश्वासघात करणारा कधी हिंदू होऊ शकत नाही, तो विश्वासघात तुम्ही आमचा केला असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला सांगतात की त्यांचे बालपण हे मुस्लिम कुटुंबासोबत गेले आहे. ही जर तुमच्या धर्माची संकल्पना असेल तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी जो काही निर्णय घेतला आणि तो पुढे कोर्टाने हाणून पाडला, त्यावर तुमची भूमिका काय? तुम्ही सांगत आहात ती धर्माची संकल्पना आम्ही मानायची, की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश मध्ये जो विचार पसरवत आहे ती संकल्पना आम्ही मांडायची? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.