Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर; महसूलमंत्र्यांची टीका

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर; महसूलमंत्र्यांची टीका

0
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : नगर : महाविकास आघाडीत कोणतीही एकवाक्यता राहिलेली नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) सातत्याने मुख्यमंत्र्यांना भेटत आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागल्याने आघाडीत आता एकवाक्यता राहिलेली नाही. त्यामुळे राज्यात महायुतीचीच सत्ता येणार आहे. योजेनमुळे सर्व बहिणींचा आशीर्वाद महायुतीलाच मिळणार आहे, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला. निमगावजाळी येथे महसूल दिनाच्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. यावेळी प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे तहसीलदार धीरज मांजरे, पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास कोते, प्रवरा बँकेचे मच्छिंद्र थेटे, रामभाऊ भुसाळ, भाऊसाहेब जऱ्हाड, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ, गुलाबराव सांगळे आदी उपस्थित हाेते.

Uddhav Thackeray

नक्की वाचा: ‘शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये’- राज ठाकरे

मंत्री विखे पाटील म्हणाले,

”जनतेच्या मनातील सरकार सतेवर असल्याने मोठ्या प्रमाणात योजना सुरू झाल्या केवळ घोषणा नाहीतर अंमलबजावणी सरकारची आहे. त्याचा लाभ थेट जनतेपर्यत पोहचविण्याकरिता महसूल पंधरवडा आयोजित केला आहे. राज्यात महायुती सरकारमुळे शेतकऱ्यांचे वीज बील माफ केले आहे. मुलीसाठी उच्चशिक्षण मोफत केले आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेकरीता जिल्ह्यात सात लाख अर्ज दाखल झाले आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या दिवशी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. महायुतीच्या पाठीशी लाडक्या बहिणींचा आशीर्वाद निश्चित राहील,” असा विश्वास व्यक्त करून फक्त योजना आपल्या महायुती सरकारची आहे. मात्र, उड्या महाविकास आघाडीचे नेते मारत असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.

अवश्य वाचा: राज्यात पावसाचा जोर ओसरणार! पुढील पाच दिवस ‘या’ ठिकाणी अलर्ट

ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कालवे भरून देण्याच्या सूचना (Uddhav Thackeray)

भंडारदारा धरणातून धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कालवे, तळे भरून देण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्या आहे. निळवंडेच्या दोन्ही कालव्यांना पाणी सोडण्यात येणार आहे. सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांच्या स्माराकासाठी अनेकांकडून तुम्हाला आश्वासन मिळाली. पण मी काम करणारा कार्यकर्ता असल्याने या स्मारकाच्या कामाकरिता पंचवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here