Uddhav Thackeray:”आमच्या दोघांतील ‘अंतरपाट’अनाजीपंतांनी दूर केला”- उद्धव ठाकरे

0
Uddhav Thackeray :
Uddhav Thackeray :"आमच्या दोघांतील 'अंतरपाट'अनाजीपंतांनी दूर केला"- उद्धव ठाकरे

नगर : आज बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे.आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला आहे. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी,असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला.

नक्की वाचा : आता ‘या’ राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास स्वस्त होणार;सरकारची घोषणा

वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ उत्साहात (Uddhav Thackeray)

महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर आज वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

अवश्य वाचा : “आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना नाही, पण देवेंद्र फडणवीसांना जमलं”- राज ठाकरे 

‘आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ’  (Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मला आज कल्पना आहे, अनेक बुवा महाराज बिझी आहेत. कोण लिंबू कापतंय, कोण रेडा कापतोय. माझ्या आजोबांनी या भोंदूपणा विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं, असं यांचं काम आहे. आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ. तुमच्या डोक्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा हात नसता तर कुठे असता तुम्ही ? मधल्या काळात यांनी सुरू केलं होतं की, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. अरे आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत, असेही त्यांनी यावेळी म्हटले.