Uddhav Thackeray:’एकवेळ देशात भाजप राहणार नाही मात्र काश्मीर आपलंच राहील’- उद्धव ठाकरे 

0
Uddhav Thackeray:'एकवेळ देशात भाजप राहणार नाही मात्र काश्मीर आपलंच राहील'- उद्धव ठाकरे 
Uddhav Thackeray:'एकवेळ देशात भाजप राहणार नाही मात्र काश्मीर आपलंच राहील'- उद्धव ठाकरे 

Uddhav Thackeray : काश्मीर हे कालही आपलं होतं, आजही आपलं आहे आणि उद्याही आपलंच राहील. एकवेळ देशात भाजप राहणार नाही मात्र काश्मीर (Kashmir) आपलंच राहील,असे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. ते शनिवारी शिवसेना भवनात आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नक्की वाचा : बीडमध्ये पुन्हा राडा!अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण  

‘देशावर काही संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधान यांच्यासोबत असू’ (Uddhav Thackeray)

आपला वैचारिक विरोध असेल पण देशावर काही संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधान यांच्यासोबत असू,आम्ही देशाच्या विरोधात नाही मात्र सरकारच्या विरोधात आहोत. ‘वन नेशन वन इलेक्शन’चा अभ्यास सुरु आहे, कमिटी महाराष्ट्रात आहे पण निवडणूक ही पारदर्शकपणे घ्या. वन नेशन वन इलेक्शन करत आहात ते ठीक आहे. मात्र पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी प्रचारात उतरू नये,असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

अवश्य वाचा :  ...तर नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळ आली नसती – एकनाथ शिंदे  

‘आमचे जहाज बुडणारे नाही,भाजपचे ओव्हरलोड झालेले जहाज हे बुडणारे आहे’ (Uddhav Thackeray)

यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. आमचे जहाज बुडणारे नाही. तर भाजपचे ओव्हरलोड झालेले जहाज हे बुडणारे आहे. अमित शहा हे तीन पक्षांचे प्रमुख आहेत. ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचेही प्रमुख आहेत. सत्ता येते व जाते. सत्ता आल्यावर हुरळून जायचे नाही व सत्ता गेल्यावर दु:ख नाही करायचे. परत सत्ता मिळवण्यासाठी कष्ट,प्रयत्न करायचे असतात. ज्यांना आपण खूप काही दिलं ते पक्ष सोडून जात आहेत. ते पक्ष सोडून गेले तरी आपल्या पक्षावर काही परिणाम होणार नाही. ज्याला सोडून जायचं त्याला जाऊ द्या. कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.