New Marathi Serial : धार्मिक विषयांवरील मालिका पाहणे प्रेक्षकांनाही आवडते. हेच लक्षात घेत महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या साडेतीन शक्तिपीठांची कथा आता छोट्या पडद्यावर उलगडणार आहे. ‘विठुमाऊली’ आणि ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकांच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनीवर (Star Pravah) ‘उदे गं अंबे, कथा साडेतीन शक्तिपीठांची’ ही नवी मालिका (New Serial) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नक्की वाचा : ‘शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये’- राज ठाकरे
साडेतीन शक्तिपीठांची कथा पौराणिक मालिकेतून उलगडणार (Ude Ga Ambe Serial)
देवीची साडेतीन शक्तिपीठे ही संपूर्ण महाराष्ट्र वासियांची मोठी श्रद्धास्थाने आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजा केली जाते. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची या पौराणिक मालिकेतून उलगडणार आहे.
अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची ‘कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही निर्मिती संस्था या मालिकेची निर्मिती करणार आहे. निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची या मालिकेचा मुहूर्त सोहळा पार पडला.
अवश्य वाचा : राज्यात पावसाचा जोर ओसरणार! पुढील पाच दिवस ‘या’ ठिकाणी अलर्ट
काय म्हणाले महेश कोठारे?(Ude Ga Ambe Serial)
याप्रसंगी महेश कोठारे यांनी म्हटले की, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुने ऋणानुबंध आहेत. ‘मन उधाण वाऱ्याचे’ ही पहिली मालिका स्टार प्रवाहसोबत केली होती. त्यानंतर ‘विठुमाऊली’, ‘दख्खनचा राजा जोतिबा’, ‘पिंकीचा विजय असो’, ‘सुख म्हणजे नक्की काय ?’ असतं अशा सुपरहिट मालिका केल्या. ‘उदे गं अबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची’ या महामालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा उलगडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही मालिकाही भव्यदिव्य असणार असून मालिकेतून कोणकोणते कलाकार भेटीला येणार? सेट कसा असेल? याविषयी प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे महेश कोठारे यांनी सांगितले.