Ude Ga Ambe New Serial:‘उदे गं अंबे’ मालिकेतून उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा; मालिकेतुन ‘या’अभिनेत्याचे कमबॅक 

0
Ude Ga Ambe New Serial:‘उदे गं अंबे' मालिकेतून उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा; मालिकेतुन 'या'अभिनेत्याचे कमबॅक 
Ude Ga Ambe New Serial:‘उदे गं अंबे' मालिकेतून उलगडणार साडेतीन शक्तिपीठांची कथा; मालिकेतुन 'या'अभिनेत्याचे कमबॅक 

Ude G Ambe Ude : छोट्या पडद्यावर सध्या पौराणिक विषयांवरील मालिकांचा ट्रेंड सुरू असल्याचे चित्र आहे. ‘विठुमाऊली’ आणि ‘दख्खनचा राजा’ जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनी (Star Pravah Channel) ‘उदे गं अंबे’ कथा साडेतीन शक्तिपीठांची’(Ude Ga Ambe Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. हाच इतिहास या मालिकेतून उलगडणार आहे.

नक्की वाचा : पुरुषोत्तम‌’ करंडकच्या अंतिम फेरीसाठी नऊ संघांची निवड

भगवान शिवशंकरांच्या भूमिकेत देवदत्त नागे दिसणार (Ude Ga Ambe New Serial)

देवींच्या साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे…कथा साडेतीन शक्तिपीठांची या पौराणिक मालिकेतून करण्यात येणार असल्याचे स्टार प्रवाहकडून सांगण्यात आले. विशेष बाब म्हणजे या मालिकेत भगवान शिवशंकरच्या भूमिकेत देवदत्त नागे दिसणार आहे. या साडेतीन शक्तिपीठांचाची निर्मिती मुळात कशी झाली हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच शक्तिरूप असलेल्या देवी सती आणि शिवशंकराच्या कथेपासून या मालिकेची सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे या मालिकेत भगवान शिवशंकराचे हे पात्र साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास  १० वर्षांनंतर देवदत्त ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत झळकणार आहे.

अवश्य वाचा : आसाम सरकारचा मोठा निर्णय;नमाज पठणासाठी आमदारांना दर शुक्रवारी मिळणारी सुट्टी बंद

देवदत्त नागे नेमके काय म्हणाले ? (Ude Ga Ambe New Serial)


‘उदे गं अंबे कथा साडेतीन शक्तीपीठांची’ या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना देवदत्त नागे म्हणाले, टीव्ही माझं आवडीचं माध्यम आहे. या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांच्या फक्त घरात नाही तर मनात देखील पोहोचता. ‘स्टार प्रवाह’च्या ‘देवयानी’ मालिकेने मला अभिनेता म्हणून ओळख दिली. जवळपास १० वर्षांनंतर मी पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’सोबत काम करतोय. प्रेक्षकांपर्यंत मालिकेच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांची गोष्ट पोहोचवण्याची संधी मिळत आहे हे मी माझं भाग्य समजतो, अशी भावना देखील देवदत्त नागे याने व्यक्त केली. शिव-शक्तीचं नातं अतूट आहे. जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे. त्यामुळे साडे-तीन शक्तीपीठींच्या या गोष्टीमध्ये शिवशंकराचे नेमके कोणते अवतार होते आणि त्यामागे नेमकी कोणती कथा दडली आहे हे या मालिकेतून साकारण्याचा प्रयत्न असणार असल्याचे त्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here