
Udyam Sahyadri Award – 2025 : नगर : उद्यम इन्फो सोल्युशन्सच्या वतीने राज्यस्तरीय उद्यम सह्याद्री पुरस्कार (Udyam Sahyadri Award – 2025) देऊन शहरातील प्रभा फूड्स (Prabha Foods) च्या प्राजक्ता देखणे यांना सन्मानित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे एमजीएम विद्यापीठ येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ व्याख्याते एन.बी. धुमाळ व एक्स्पर्ट ग्लोबल सोल्युशनचे डायरेक्टर प्रशांत देशपांडे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी सोल्युशन्सचे संचालक गोविंद उल्लास भाले व पदाधिकारी उपस्थित होते. गृह उद्योग या क्षेत्रामध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील इन्फो सोल्युशन्सच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे.
अवश्य वाचा: लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता मोठी कारवाई
घरेलू पद्धतीने जेवणाची सेवा देण्याचे काम
प्रभा फूड्स च्या माध्यमातून अहिल्यानगर शहरामध्ये विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तयार करून अनेक ठिकाणी ते वितरित करून घरेलू पद्धतीने जेवणाची सेवा देण्याचे काम देखणे यांनी केले आहे. दिवाळी फराळ असो अथवा लग्न समारंभ असो विविध कार्यक्रमांमध्ये घरगुती पद्धतीचे जेवण नाश्ता त्या वितरित करत असतात.
नक्की वाचा : वेळ आली तर पक्ष स्वबळावर लढण्यासही तयार : अभिषेक कळमकर
पुरस्कार मिळाल्याने अधिक जोमाने काम (Udyam Sahyadri Award – 2025)
पुरस्कार मिळाल्याने फूड्स क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे, अशी भावना त्यांनीनी व्यक्त केली. मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


