Ujjain Fire:उज्जैनच्या महाकाल मंदिरात आगीचा भडका;पुजाऱ्यांसह अनेक जण होरपळले

मध्य प्रदेशातील या महाकाल मंदिरात मोठं अग्नितांडव घडलं आहे. महाकाल मंदिरातील भस्मा आरती दरम्यान मंदिरातील गाभाऱ्यातच भीषण आग लागली.

0
Ujjain Fire
Ujjain Fire

नगर : जगप्रसिद्ध असलेल्या उज्जैन महाकाल (Ujjain Mahakal) मंदिरात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) या महाकाल मंदिरात (Mahakal Temple) मोठं अग्नितांडव घडलं आहे. महाकाल मंदिरातील भस्मा आरती दरम्यान मंदिरातील गाभाऱ्यातच भीषण आग लागली. या आगीत पुजारी होरपळून गंभीररित्या जखमी झाले आहेत. होळीमध्ये गुलाल टाकल्यानं आग भडकली आणि संपूर्ण गर्भगृहात पसरली. या जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अवश्य वाचा : एसआयटीच्या चौकशीला मी घाबरत नाही : मनोज जरांगे पाटील

महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात लागली आग (Ujjain Fire)

आज सोमवारी (ता.२५) सकाळी महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात लागलेल्या आगीत पुजाऱ्यासह १३ जण होरपळून निघाले. भस्म आरतीच्या वेळी अबीर-गुलाल लावला जात होता. त्याचवेळी आग लागली.  गर्भगृहातील आग वेळीच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेनं उपस्थित असणाऱ्या लोकांमध्ये गोंधळ उडाला होता. या घटनेची माहिती देताना उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी सांगितलं की,आग आटोक्यात आणण्यात आली आहे. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. आगीच्या घटनेमुळे पुजाऱ्यासह काहीजणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

हेही पहा : शेतकरी संघटनेची गांधीगिरी; कारखान्याचा संचालकाचा केला सत्कार

काय घडली घटना ? (Ujjain Fire)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी असलेलं महाकांलेश्वर मंदिर हे बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक स्थान आहे. इथे आरतीच्या वेळी गुलाल उधळत असताना ही घटना घडली. आज धुळवड असल्याने मंदिरात गुलाल उधळण्यात येत होता. कुणीतरी पुजारी संजीव यांच्यावरही गुलाल उधळला. त्यावेळी त्यांच्या हातात आरती होती. गुलालातले रसायन आगीत मिसळले गेल्याने आग भडकली असावी, असा अंदाज काही प्रत्यक्षदर्शींनी वर्तवला आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या ज्या भिंती आहेत. त्यांना चांदीचा मुलामा देण्यात आला आहे. या ठिकाणी गुलाल उधळला जाऊ नये म्हणून फ्लेक्स लावण्यात आले होते. मात्र आगीमध्ये हे फ्लेक्स देखील जळालेत. यावेळी अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here