Unani Treatmen : नगर : युनानी उपचार (Unani Treatment) पद्धती निसर्गानुरूप असल्याने तिचे दुष्परिणाम होत नाहीत. जुनाट आजार तसेच कायम औषधोपचाराची गरज असलेल्या रुग्णांनी युनानी उपचारांचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनाली बांगर (Dr. Sonali Bangar) यांनी केले. प्रसिद्ध भारतीय युनानी तज्ज्ञ हकीम अजमल खान (Unani Expert Hakim Ajmal Khan) यांच्या जन्मदिवसानिमित्त जागतिक युनानी दिवस साजरा केला जातो. जिल्हा आयुष रुग्णालयात हा दिवस अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ. बांगर बोलत होत्या. यावेळी युनानी तज्ज्ञ डॉ. नाझिया शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहान शाह, डॉ. इरशाद मोमीन, डॉ. शौनक मिरीकर आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : महापौर गाडे यांची जुन्या महापालिकेत अचानक पाहणी; स्वच्छतेबाबत व्यक्त केली नाराजी
डॉ. बांगर म्हणाल्या की
वैद्यकीय अधीक्षक डॉ. बांगर म्हणाल्या, जिल्हा आयुष रुग्णालयाच्या माध्यमातून आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग उपचारांचा लाभ मोठ्या संख्येने नागरिक घेत असून रोगाच्या उपचाराबरोबर नियंत्रणही आयुष सेवांमुळे शक्य झाले आहे. नागरिकांनी या सेवेचा अधिक प्रमाणात लाभ घ्यावा, असेही त्या म्हणाल्या. डॉ. नाझिया शेख म्हणाल्या, केवळ आजारांवर उपचार म्हणूनच नाही तर आजार होऊ नये म्हणून युनानी उपचार उपयोगी आहेत. निसर्गास अनुरूप अशा आयुर्वेदिक औषधांप्रमाणे युनानी औषधे असल्याने ती शरीरात सहज स्वीकारली जातात. युनानी औषधांचे दुष्परिणामही होत नाहीत. युनानी औषधे वनस्पती, खनिजे आणि प्राणिज पदार्थांपासून तयार केली जात असल्याने आजारावर लवकर नियंत्रण मिळवता येणे शक्य होत असल्याचे त्या म्हणाल्या.
अवश्य वाचा : डोळ्यांनी अंध असली तरी ‘ती’ देणार डोळस न्याय!थान्या नाथन नेमक्या कोण ?
युनानी उपचार पद्धतीने बऱ्या झालेल्या आजारांविषयी दिली माहिती (Unani Treatment)
युनानी तज्ज्ञ डॉ. इरशाद मोमीन यांनी युनानी उपचार पद्धतीने बऱ्या झालेल्या अथवा नियंत्रणात असलेल्या दुर्धर आजारांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहान शाह यांनी केले. प्रास्ताविक डॉ. इरशाद मोमीन यांनी केले, तर डॉ. शौनक मिरीकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. जयश्री मस्के, डॉ. इर्शाद मोमीन, डॉ. हरलीनकौर पुरी, डॉ. शोभा धुमाळ, रुग्णालयाचे अजिंक्य पवार, अविनाश नाबदे, अजिंक्य भिंगारदिवे, हर्षा फाळके, पवन सिसोदे, अनिकेत भडके, एलिझाबेथ तेलधुणे, संगीता नन्नवरे, चैतन्य निकम, अश्विनी बोरगे, योगिता कदम, विशाल केदारी, वर्षा जाधव, अश्विनी निमसे, सागर सुळ यांनी परिश्रम घेतले.



